बुलडाणा जिल्ह्यातील 66 गावात दुष्काळ घोषित

बुलडाणा जिल्ह्यातील 66 गावात दुष्काळ घोषित

बुलडाणा : जिल्ह्यातील खामगाव उपविभागातील खामगाव तालुक्यातील ४५ व शेगाव तालुक्यातील २१ गावांमध्ये पाणीटंचाई घोषित करण्यात आली आहे. या गावांमध्ये महाराष्ट्र भूजल विकास अधिनियम २००९ लागू करण्यात आला आहे. या अधिनियमानुसार अधिसूचित सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतच्या ५०० मीटरच्या अंतरामध्ये कोणीही व्यक्ती, कोणत्याही विहिरीचे खोदकाम करण्यास मनाई करण्यात आली आहे.

भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने पुरविलेल्या माहितीच्या आधारे सार्वजनिक पिण्याच्या स्रोतांभोवती निश्‍चित व अधिसूचित केलेल्या प्रभाव क्षेत्रात कोणतीही व्यक्ती कोणत्याही प्रयोजनासाठी विहिरीचे खोदकाम करणार नाही. प्रभाव क्षेत्रामधील किंवा सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांपासून एक किलोमीटर अंतरामध्ये यापैकी जे अधिक असेल, अशा क्षेत्रातील अशी विहीर तात्पुरती बंद करणे, भूजल काढण्यासाठी विहित करण्याच्या दृष्टीने विनियम करण्यात येईल. भूजल पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होईल, अशी कोणतीही कृती कोणीही करणार नाही. या अधिनियमनातील विविध तरतुदींचा भंग झाल्यास दंड व शिक्षकेरिता संबंधित तहसीलदारांनी त्वरित अहवाल सादर करावयाचा आहे, असे आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

अधिनियम लागू केलेली गावे
खामगाव तालुका : लांजूड, पिंप्री देशमुख, किन्ही महादेव, चिखली बुद्रुक, जळका तेली, शिराळा, निपाणा, चिखली खुर्द, हिवरा खुर्द, उमरा, आवार, बोरजवळा, शेलोडी, लोणी गुरव, वाकुड, गारडगाव, राहुड, पळशी खुर्द, दापटी, हिवरा बुद्रुक, चितोडा, घाणेगाव, अंबिकापूर, हिंगणा कारेगाव, खामगाव ग्रामीण, कुऱ्हा, जयपूर लांडे, ढोरपगाव, घाटपुरी, फत्तेपूर, नागझरी खुर्द, श्रीधर नगर, झोडगा, पळशी बुद्रुक, धदम, तांदूळवाडी, पारधी फाटा अंत्रज, बेलखेड, पोरज, माक्ता/कोक्ता, इवरा, नागझरी बुद्रुक, कवडगाव, भंडारी, तरोडानाथ,

शेगाव तालुका : हिंगणा वैजनाथ, घुई, उनारखेड, माटरगांव बुद्रुक, जानुरी, तिंत्रव, तरोडा, वरखेड बुद्रुक, गव्हाण, वरुड, गायगाव बुद्रुक, गायगाव खर्द, कनारखेड, टाकळी विरो, चिंचोली, सवर्णा, गौलखेड, कुरखेड, भोनगाव, आळसणा व जलंब

Web Title - there announced drought in buldana's 66 villages

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com