आता मंत्रिपदावरुन महाविकासआघाडीत चुरस, मागण्या वाढल्या!

साम टीव्ही न्यूज
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

मुंबई : एकीकडे आघाडीच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झालीय. तर दुसरीकडे काँग्रेसकडून समसमान मंत्रिपदांची मागणी करण्यात आल्याची सुत्रांची महिती आहे.काँग्रेसकडून 14 मंत्रिपदांची मागणी करण्यात आल्याचं वृत्त आहे. आजच्या बैठकीत मंत्रिपदावर चर्चा होईल त्यानंतर सत्तास्थापनेवर शिक्कामोर्तब होईल असं बोललं जातंय. 

महाविकासआघाडीवर शिक्कामोर्तब होणं ही निव्वळ औपचारिकता असली तरीही मंत्रिपदावरून या तिनही पक्षांमध्ये प्रचंड चुरस आहे. काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपदासह गृह, वित्त, ग्रामीण विकास,आणि महसूल ही खाती हवीत. तर शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासह नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, गृह, शिक्षण मंत्रालय आपल्याला मिळावं ही इच्छा आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसनं गृह, अर्थ, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा आणि ग्रामीण विकास विभागावर आपला दावा केलाय. याशिवाय अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदावरही राष्ट्रवादीनं दावा केल्याचं समजतंय. 

WEB TITLE - THERE IS MISMATCH IN SENA NCP AND CONGRESS ABOUT MINISTERS POST 

संबंधित बातम्या

Saam TV Live