राज्यात कोरोना रुग्णांनी गाठला 5 हजारांचा आकडा, तर एकाच दिवशी 150 रुग्ण बरे झाले...

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 22 एप्रिल 2020

८३ हजार १११ नमुन्यांपैकी ७७ हजार ६३८ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत तर ५२१८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९९ हजार ५६९ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून ७,८०८ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

राज्यातल्या कोरोनाबाधितांच्या संख्येने पाच हजारांचा टप्पा गाठलाय. मंगळवारी राज्यात ५५२ नवे कोरोना रुग्ण सापडले असून राज्यातल्या कोरोनाबाधितांचा आकडा ५ हजार २१८ वर गेलाय. काल दिवसभरात तब्बल १५० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय. तर १९ कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झालाय. राज्यात आत्तापर्यंत ७२२ रुग्ण बरे झालेत.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८३ हजार १११ नमुन्यांपैकी ७७ हजार ६३८ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत तर ५२१८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९९ हजार ५६९ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून ७,८०८ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. आज १९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या आता २५१ झाली आहे.

आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई येथील १२, पुण्यातील ३, ठाणे मनपामधील २ तर सांगली येथील १ आणि पिंपरी चिंचवड येथील १ रुग्ण आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी १० पुरुष तर ९ महिला आहेत. त्यात ६० वर्षे किंवा त्यावरील ९ रुग्ण आहेत तर ९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर १ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. या १९ मृत्यूंपैकी १२ रुग्णांमध्ये ( ६३ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ४३२ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून एकूण ६६११ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी १६.८९ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

Web Title - marathi news there is more than 5 thausands corona patients in maharashtra


संबंधित बातम्या

Saam TV Live