राज्यातील या चार जिल्ह्यात गेल्या 14 दिवसांत कोरोनाचा एकही नवीन रूग्ण नाही...

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 22 एप्रिल 2020

एकीकडे मुंबई-पुण्यात दररोज रूग्णांची संख्या वाढत असताना राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये रूग्णसंख्या न वाढणं, ही निश्चितच समाधानाची बाब म्हणावी लागेल. 

महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमधून एक चांगली बातमी येतीय. चार जिल्ह्यांमधून गेल्या 14 दिवसांमध्ये कोरोनाचा एकही नवीन रूग्ण आढळलेला नाही. या जिल्ह्यांमध्ये  लातूर, उस्मानाबाद, हिंगोली आणि वाशिमचा समावेश आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिलीय. एकीकडे मुंबई-पुण्यात दररोज रूग्णांची संख्या वाढत असताना राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये रूग्णसंख्या न वाढणं, ही निश्चितच समाधानाची बाब म्हणावी लागेल. 

पाहा सविस्तर व्हिडीओ-

तर राज्यातल्या कोरोनाबाधितांच्या संख्येने पाच हजारांचा टप्पा गाठलाय. मंगळवारी राज्यात ५५२ नवे कोरोना रुग्ण सापडले असून राज्यातल्या कोरोनाबाधितांचा आकडा ५ हजार २१८ वर गेलाय. काल दिवसभरात तब्बल १५० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय. तर १९ कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झालाय. राज्यात आत्तापर्यंत ७२२ रुग्ण बरे झालेत.

 मृत्यूपैकी मुंबई येथील १२, पुण्यातील ३, ठाणे मनपामधील २ तर सांगली येथील १ आणि पिंपरी चिंचवड येथील १ रुग्ण आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी १० पुरुष तर ९ महिला आहेत. त्यात ६० वर्षे किंवा त्यावरील ९ रुग्ण आहेत तर ९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर १ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. या १९ मृत्यूंपैकी १२ रुग्णांमध्ये ( ६३ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ४३२ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून एकूण ६६११ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी १६.८९ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

अशातच या चार शहरांबाबत समाधानी आहे. 


संबंधित बातम्या

Saam TV Live