आता विद्यार्थ्यांना जात पडताळणीची गरज नाही

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 27 जून 2019

मुंबई - राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माण, हॉटेल मॅनेजमेंट, वास्तुकला या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशावेळी मराठा समाजासह अन्य प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र लगेच देण्याची गरज नाही, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधिमंडळात केली. त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

मुंबई - राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माण, हॉटेल मॅनेजमेंट, वास्तुकला या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशावेळी मराठा समाजासह अन्य प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र लगेच देण्याची गरज नाही, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधिमंडळात केली. त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

राज्यातील तंत्रशिक्षण अभ्यासक्रमासह अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना पहिल्याच फेरीसाठी कागदपत्रांच्या जात पडताळणीमध्ये जात पडताळणी प्रमाणपत्रही सादर करण्याची सूचना काल जाहीर करण्यात आली होती; परंतु या संदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश नियमन समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती देशमुख, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे, श्रमिक, विमुक्त जाती, भटक्‍या जमाती, इतर मागास वर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याणमंत्री संजय कुटे, विभाग सचिवांची बैठक झाली. तावडे म्हणाले, मराठा समाजाचा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गामध्ये (एसईबीसी) समावेश करण्यात आला आहे. या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या जातप्रमाणपत्राची पडताळणी करण्याकरिता पुरेशी यंत्रणा तूर्तास उपलब्ध नाही. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या एसईबीसी प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांनी संबंधित जातपडताळणी समितीकडे अर्ज दाखल केला आहे, अशा विद्यार्थ्यास प्रवेशावेळी प्रमाणपत्र सादर करण्याची सक्ती करण्यात येणार नाही. 

प्रवेश नियामक प्राधिकरणाकडून तारीख निश्‍चिती
व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, वि.जा.भ.ज., इ.मा.व. व विशेष मागास प्रवर्ग या सर्व प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांकडे अर्ज सादर करताना जातपडताळणी प्रमाणपत्र नसेल, अशा विद्यार्थ्यांना प्रवेशाची दुसरी फेरी सुरू होण्यापूर्वी प्रवेश नियामक प्राधिकरण निश्‍चित करेल अशा तारखेपर्यंत जातपडताळणी प्रमाणपत्र दाखल करण्याची मुदत वाढवून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.

Web Title: There is no need to verify caste verification


संबंधित बातम्या

Saam TV Live