Good News | कोरोनावर लस मिळाली, सप्टेंबरपर्यंत बाजारात लस उपलब्ध होईल...

साम टीव्ही
रविवार, 19 एप्रिल 2020

कोरोनावर लस मिळाल्याचा दावा ब्रिटीश वैज्ञानिकांनी केलाय. सप्टेंबरपर्यंत ही लस बाजारात येईल

अत्यंत दिलासादायक बातमी आहे. कोरोनावर लस मिळाल्याचा दावा ब्रिटीश वैज्ञानिकांनी केलाय. सप्टेंबरपर्यंत ही लस बाजारात येईल असा दावाही इंग्लंडच्या संशोधकांनी केलाय.

पाहा सविस्तर व्हिडीओ-

कोरोनाच्या जागतिक महामारीत आजघडीची सर्वात दिलासादायक बातमी समोर येतेय. ब्रिटनच्या वैज्ञानिकांनी कोरोनावर लस सापडल्याचा दावा केलाय. सप्टेंबरपर्यंत ही लस बाजारात उपलब्ध होईल, असाही दावा वैज्ञानिकांनी केलाय. ब्रिटनच्या ऑक्सफोर्ड महाविद्यालयातील लसशास्त्र विभागाकडून हा दावा करण्यात आलाय. 

मलेरियावर प्रभावी ठरणाऱ्या हायड्रो-क्सि-क्लोरिक्वीनसोबत या लसीची १२ परीक्षणं करण्यात आलीयेत. ही चाचणी यशस्वी होण्याआधीच ऑक्सफर्डच्या उत्पादन विभागाकडून लसीचं उत्पादन सुरु करण्यात आलंय. सप्टेंबरपर्यंत या लसीचे १० लाख डोस ब्रिटन उपलब्ध करुन देणार आहे. जगभरात कोरोनाचं थैमान थांबत नाहीये. त्यामुळे लवकरात लवकर लस मिळावी अशी प्रार्थना केली जातेय. आशा करुयात की ब्रिटनचा दावा खरा निघेल आणि कोरोनावर लस तात्काळ शोधली जाईल.


संबंधित बातम्या

Saam TV Live