देशासह महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती गंभीर पाहा कुठे किती रुग्ण वाढले...

साम टीव्ही
मंगळवार, 7 एप्रिल 2020

देशभरात कोरोनाचे 4 हजार 421 रुग्ण सापडले आहेत. सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून दिल्ली मध्ये रुग्णांची संख्या 500हून अधिक आहेत तर तामिनाडूमधील रुग्णांची संख्या 600 च्या वर गेलीय,

देशभरात कोरोनाचे 4 हजार 421 रुग्ण सापडले आहेत. सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून दिल्ली मध्ये रुग्णांची संख्या 500हून अधिक आहेत तर तामिनाडूमधील रुग्णांची संख्या 600 च्या वर गेलीय, तर केरळ, उत्तर प्रदेश आणि तेलंगणात 300 हून अधिक रुग्ण सापडले आहेत. सध्या देशभरातल्या विविध रुग्णालयांमध्ये 3 हजार 981 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर मृतांचा आकडा 114 वर पोचला असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे. देशात आतापर्यंत 326 जणांवर यशस्वी उपचार झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 870 वर पोहचलीय .राज्यात काल नवीन 122 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत. तर एका दिवसात राज्यात 7 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय. यात मुंबईतील चार, नवी मुंबई, ठाणे, वसई-विरारमधील प्रत्येकी एका नागरिकाचा समावेश आहे. 66 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागानं दिलीय.

पाहा सविस्तर व्हिडीओ - 

 

 

राज्यात आतार्यंत पाठविण्यात आलेल्या १७ हजार ५६३ 

दरम्यान, जगभरातील मृतांची संख्या ७३ हजार ७५० वर पोहोचली आहे. दरम्यान जगभरात १३ लाख २८ हजार १५० जणांना करोनाची लागण झाली आहे. यापैकी दोन लाख लोकांना उपचार करुन घरी पाठवण्यात आलेलं आहे. दुसरीकडे भारतात ४७७८ लोकांना करोनाची लागण झाली असून मृतांची संख्या १३६ वर पोहोचली आहे.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live