कोणतीही सेटलमेंट झाली नव्हती; दानवे भाषणाच्या ओघात बोलले: खोतकर

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 9 जून 2019

जालना : अर्जुन खोतकर आणि माझ्यात दोन महिने आधीच सेटलमेंट झाली होती.असा गौप्यस्फोट भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या जालन्यातील सत्कार सोहळ्यात केला होता. यावर शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी उत्तर दिलं आहे. दानवें आणि माझ्यात कोणतीही सेटलमेंट झाली नव्हती. 

मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या माध्यस्थीनंतरच आपण माघार घेतली असं अर्जुन खोतकरांनी म्हटलं आहे. मी दानवे यांची प्रतिमा जपण्याचा प्रयत्न केला.यापुढच्या काळात दोघेही एकमेकांची प्रतिमा जपण्याचा प्रयत्न करू, असेही खोतकर म्हणाले. दानवे यांच्या गौप्यस्फोटानंतर या संदर्भात आपल्याला उद्धव ठाकरे यांनी विचारणा केली असून त्यांच्या कानावर आपण ही बाब घातल्याचं देखील खोतकर म्हणाले. दानवे यांनी भाषणात मजा करताना सेटलमेंट झाल्याचं सांगितलं, असंही खोतकर यांनी स्पष्ट केलं.

web tittle : There was no settlement ; khotkar

संबंधित बातम्या

Saam TV Live