VIDEO | सिलिंडरमध्ये गॅसऐवजी निघालं चक्क पाणी

VIDEO | सिलिंडरमध्ये गॅसऐवजी निघालं चक्क पाणी

घरी वापरल्या जाणाऱ्या गॅस सिलिंडरमध्ये गॅसऐवजी पाणी भरलेलं तुम्ही कधी ऐकलंय का? कदाचित हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल पण हे खरंय! कारण ग्राहकांना लुटण्याची वेगळीच घटना चंद्रपूर जिल्ह्यात समोर आलीय. नेमकं घ़डलं चंद्रपूरात, पाहुयात एक रिपोर्ट...

घरी वापरल्या जाणाऱ्या गॅस सिलिंडरमध्ये गॅसऐवजी पाणी भरलेलं तुम्ही कधी ऐकलंय का? धक्का बसला ना? पण असा प्रकार घडलाय चंद्रपूर जिल्ह्यात. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात भिसी गावात गॅस सिलिंडरमधून पाणी निघाल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. ही दृश्य पाहा. शांताबाई मोटघरे यांच्या घरातला सिलिंडर चौथ्या दिवशी बंड पडला. तीन दिवसात गॅस कसा काय संपू शकतो, असा प्रश्न घरच्यांना पडला. त्यांनी सिलिंडर बाहेर काढून तो हलवून बघितला, तर त्यात जलयुक्त पदार्थ हलत असल्याचं जाणवलं. त्यामुळं त्यांनी हा पदार्थ बाहेर काढून बघितला. मग काय, सर्वांना धक्काच बसला. कारण सिलिंडरमधून चक्क हंडाभर पाणी निघालं.
श्री गॅस डोमेस्टिक अप्लायन्स या एजन्सीमधून इंडेन कंपनीचा हा सिलेंडर असल्याचं समोर आलंय. ही तांत्रिक चूक असल्याचं कंपनी एजन्सीकडून सांगण्यात आलंय. 
सिलिंडरमधून पाणी निघालं, पण सुदैवानं कोणतीही दुर्घटना घडली नाही. पण अशी घटना घडायची वाट पाहायची का ? असा संतप्त सवाल विचारला जातोय. त्यामुळे या प्रकाराची सखोल चौकशी करुन पुन्हा असा प्रकार कोणासोबत घडू नये याची दक्षता घेणं गरजेचं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com