येत्या काही दिवसांत टॅक्सी आणि रिक्षा मिळणं मुश्कील होणार...

साम टीव्ही
शनिवार, 16 मे 2020
  • कोरोनाच्या संकटात मुंबईतून रिक्षा आणि टॅक्सी गायब?
  • हजारो रिक्षा आणि टॅक्सी निघाल्या गावाला
  • मुंबईकरांना टॅक्सी, रिक्षा कमी पडणार?

मुंबईत येत्या काही दिवसांत टॅक्सी आणि रिक्षा मिळणं मुश्कील होण्याची शक्यताय.  मुंबईच्या रस्त्यावरून चाललेल्या या रिक्षा पाहून आश्चर्य वाटलं ना? इतक्या रिक्षा नेमक्या कुठं चालल्यात असा प्रश्न तुम्हाला पडलाय ना? मुंबईत राहणाऱ्या कुणालाही हा प्रश्न नक्कीच पडेल. पण या रिक्षांच्या मागे लागलाय कोरोना. हो... खरंच... कोरोनाला घाबरून हजारो रिक्षा आणि टॅक्सीचालकांनी गावाची वाट धरलीय. रिक्षावरून चाललेल्या रिक्षांता हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असला तरी, रिक्षा-टॅक्सी युनियनच्या एका अध्यक्षाने दिलेल्या माहितीनुसार

मुंबईतून रिक्षा-टॅक्सी गायब?
कोरोनामुळे मुंबईतून आतापर्यंत 25, 000 रिक्षा गावी गेल्यात त्याचसोबत तब्बल 7, 000 टॅक्सीही गावाकडे निघून गेल्यायत. आणखी सुमारे 40, 000 रिक्षा आणि सुमारे 20, 000 टॅक्सी मुंबईबाहेर जाण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असला तरी, मुंबईबाहेर पडणाऱ्या हजारो रिक्षा-टॅक्सींचं निदर्शक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात रिक्षा आणि टॅक्सी मुंबईबाहेर पडत असतील तर, मुंबईकरांना रिक्षा आणि टॅक्सी मिळणं कठीण होऊन बसणार हे नक्की.

Web Title - marathi news there will be short of taxis and rickshaws in mumbai due to corona...


संबंधित बातम्या

Saam TV Live