अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार, 2 दिवसांत 2300 हून अधिक जणांचा मृत्यू

साम टीव्ही न्यूज
रविवार, 5 एप्रिल 2020

अमेरिकेत करोनाच्या संसर्गानं अक्षरश: थैमान घातलंय. गेल्या दोन दिवसांत अमेरिकेत करोनानं 2300 हून अधिक बळी घेतले आहेत. 

कोरोना विषाणूनं अमेरिकेभोवतीचा विळखा घट्ट केला असून शनिवारपर्यंत आठ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झालाय. अमेरिकेत करोनामुळे 8 हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून तिथलं सरकार आता लष्कराला मदत कार्यात उतरणार आहे. गुरुवार ते शुक्रवारमधील 24 तासांमध्ये तिथं तब्बल 1480 जणांचा मृत्यू झाला. तर, शनिवारी जवळपास 1300 जणांचा मृत्यू झाला. शुक्रवारी नोंदवण्यात आलेल्या मृतांची संख्या ही आतापर्यंत एका दिवसात एका देशात करोनामुळे झालेले हे सर्वाधिक मृत्यू आहेत. दरम्यान, अमेरिकेनं मदतकार्यासाठी लष्कराची मदत घेण्यास सुरुवात केली असून, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही लष्कराची या लढ्यातील भूमिका वाढवत असल्याचं जाहीर केलंय. 

अमेरिकेमध्ये करोनाच्या फैलावाचा सर्वाधिक फटका न्यूयॉर्क राज्याला बसलाय. शनिवारी न्यूयॉर्कमध्ये 630 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आलीय . दिवसातील प्रत्येक अडीच मिनिटांनी एका रुग्णाचा मृत्यू होतोय. न्यूयॉर्कमध्येच आतापर्यंत 3 हजारांहून अधिक जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत.

दरम्यान कोरोनाविरूद्धच्या लढ्यात अमेरिकेनं भारताकडे मदत मागितलीय. कोरोनावर हाइड्रोक्सीक्लोरोक्वाइन टॅबलेट्स उपयोगी असल्याचं सिद्ध होतंय. आणि भारतात या औषधाचं मोठ्या प्रमाणावर उप्तादन होतं. त्यामुळे अमेरिकेतल्या लोकांना वाचवण्यासाठी भारतानं मदत करावी असं आवाहन अमेरिकेकडून करण्यात आलंय. 


संबंधित बातम्या

Saam TV Live