राज्यात थर्माकोलची  बंदी असूनही थर्माकोलची सर्रास विक्री सुरु

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

पुणे - पर्यावरणाला धोका निर्माण करणाऱ्या प्लॅस्टिक व थर्माकोल वापरावर राज्य सरकारने बंदी घातली; परंतु सरकारचे आदेश धाब्यावर बसवीत विक्रेत्यांकडून थर्माकोलची विक्री सुरू आहे. गणेशोत्सवानिमित्त रविवार पेठेतील बोहरी आळी येथे सर्रासपणे थर्माकोलची शीट, मखर व मंदिरांची विक्री सुरू आहे. 

पुणे - पर्यावरणाला धोका निर्माण करणाऱ्या प्लॅस्टिक व थर्माकोल वापरावर राज्य सरकारने बंदी घातली; परंतु सरकारचे आदेश धाब्यावर बसवीत विक्रेत्यांकडून थर्माकोलची विक्री सुरू आहे. गणेशोत्सवानिमित्त रविवार पेठेतील बोहरी आळी येथे सर्रासपणे थर्माकोलची शीट, मखर व मंदिरांची विक्री सुरू आहे. 

प्लॅस्टिक व थर्माकोल हे प्रदूषण वाढविणारे घटक असलने पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने त्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. याबाबत सरकारने काढलेल्या अध्यादेशाला विक्रेते व ग्राहकांनी केराची टोपली दाखविली असल्याचे दिसून येत आहे. पाचशेपासून पंचवीस हजार रुपयांपर्यंतची थर्माकोलची मखरे, मंदिरे बाजारात विक्रीस ठेवली आहेत; तसेच थर्माकोलचे सजावटीचे साहित्य विक्रीस ठेवल्याचे चित्र बाजरात दिसून आले. 

याबाबत पुणे थर्माकोल कलाकार संघटनेचे उपाध्यक्ष संतोष दाहोत्रे म्हणाले, 'दरवर्षी गणेशोत्सवासाठी कारागीर थर्माकोलची मखर व मंदिरे तयार करतात. या व्यवसायात नव्वद टक्के कारागीर मराठी भाषक आहेत. त्यांच्याकडून गुजराती व मारवाडी व्यापारी उत्पादन खरेदी करून विकतात. 
कारागिरांनी कर्ज काढून थर्माकोलचे साहित्य विकत घेतात.'' 

नव्या वस्तू बनविणार नाही - दाहोत्रे 
पुणे, मुंबई, नाशिक, कोकण आणि अहमदनगर येथेच थर्माकोलची विक्री गणेशोत्सवात होते. थर्माकोलवर घातलेल्या बंदीचा सरकारने पुनर्विचार करावा, या मागणीसाठी संघटनेच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. याबाबतचा अध्यादेश निघण्याअगोदरच कारागिरांनी कामाला सुरवात केली होती; तसेच जीएसटीसुद्धा भरला होता. तयार उत्पादनाची विक्री झाल्यावर पुन्हा नव्याने वस्तू बनविणार नसल्याचे आम्ही सरकारला सांगितल्याचे संतोष दाहोत्रे यांनी सांगितले.

Web Title : marathi news thermocol decoration sold in Maharashtra even after ban 


संबंधित बातम्या

Saam TV Live