VIDEO | 'हे' 12 आमदार भाजपला देणार सोडचिठ्ठी ?

संजय डाफसह राजू सोनावणे
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

मोठ्या तोऱ्यात महाभरती करणाऱ्या भाजपला आता महागळती लागण्याची शक्यता आहे. भाजपनं जे पेरलंय, तेच आता उगवणार असल्याचं चित्र आहे. पाहुयात याबाबतचा एक विशेष वृत्तांत...

 

मोठ्या तोऱ्यात महाभरती करणाऱ्या भाजपला आता महागळती लागण्याची शक्यता आहे. भाजपनं जे पेरलंय, तेच आता उगवणार असल्याचं चित्र आहे. पाहुयात याबाबतचा एक विशेष वृत्तांत...

 

मोठ्या तोऱ्यात महाभरती करणाऱ्या भाजपला आता महागळती लागणार आहे. कारण डझनभर आमदारांनी तसंच राज्यसभेच्या एका विद्यमान खासदारानं भाजपला 'धक्का' देण्याची तयारी चालवलीय. मेगाभरतीदरम्यान भाजपत दाखल झालेले आणि निवडून आलेले डझनभर आमदार स्वगृही परतण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी नेतृत्वाकडून ग्रीन सिग्नल मिळण्याची हे आमदार वाट पाहत आहेत.
दुसरीकडे भाजपनं मात्र एकही आमदार फुटणार नाही, असा दावा केलाय. नागपूर हिवाळी अधिवेशनानंतर या डझनभर आमदारांच्या घरवापसीबद्दल काँग्रेस-राष्ट्रवादीकडून विचार करण्यात येणार आहे. ऑपरेशन लोटसद्वारे भाजपनं सर्व पक्षातून मेगाभरती केली होती. मात्र आता भाजपनं जे पेरलं तेच उगवतंय. ऑपरेशन लोटस पलटी झाल्याचं चित्र निर्माण झालंय.
 

WEB TITLE - THESE 12 MLA'S LEAVING BJP?


संबंधित बातम्या

Saam TV Live