ड्रग्स प्रकरणातल्या SAR चा झाला उलगडा? वाचा ते 3 दिग्गज हिरो कोण आहेत?

साम टीव्ही
गुरुवार, 1 ऑक्टोबर 2020
  • ड्रग्स प्रकरणातल्या SAR चा झाला उलगडा?
  • दैनिक भास्कर वृत्तपत्राने केला दावा

दीपिका, सारा आणि श्रद्धानंतर आता बॉलिवुड मधील तीन मोठे स्टार्स आता NCB च्या रडारवर आलेत. अभिनेत्रींच्या चौकशीदरम्यान बॉलिवूडमधल्या काही बड्या अभिनेत्यांची आद्याक्षरं समोर आली होती. देशातलं अग्रगण्य वृत्तपत्र असलेल्या दैनिक भास्करने या प्रकरणी एक खळबळजनक वृत्त प्रसिद्ध केलंय. 

NCB च्या चौकशीतून आलेली S, A आणि R ही आद्याक्षरं म्हणजे दुसरे तिसरे कुणीही नसून शाहरूख खान, अर्जून रामपाल आणि रणबीर कपूर असल्याचा दावा दैनिक भास्करने आपल्या विशेष वृत्तामध्ये केलाय. याशिवाय डिनो मोरियाचं नावही चौकशीतून समोर आल्याचा उल्लेखही या वृत्तात करण्यात आलाय. या चौकशीप्रक्रियेत सहभागी असलेल्या एका बड्या NCB अधिकाऱ्यानेच ही माहिती आपल्याला दिल्याचं दैनिक भास्करने आपल्या वृत्तात म्हटलंय. या अधिकाऱ्यासोबतचा संवादही आपल्याकडे असल्याचा दावा या वृत्तपत्राने केलाय.

यापैकी अर्जून रामपाल हाच शाहरूखला ड्रग्ज पुरवायचा, असंही NCB च्या चौकशीतून समोर आल्याचं वृत्तात नमूद करण्यात आलंय. या धक्कादायक खुलाशानंतर एनसीबीचे डीजी राकेश अस्थाना स्वत: मुंबईत दाखल झाले होते. तपासाची पुढची दिशा कशी असावी? याबाबतच्या सूचना त्यांनी आपल्या टीमला दिल्यात. त्यामुळे लवकरच बॉलिवुडचा खरा चेहरा समोर येण्याची शक्यता आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live