वाचा, राज्यात शॉपींग मॉल्ससह या गोष्टी कधी सुरु होणार?

साम टीव्ही
गुरुवार, 23 जुलै 2020

राज्यात स्विमिंग पूल, जिम, शॉपिंग मॉल लवकरच सुरु करण्यात येण्याची शक्यताय. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तसे संकेत दिलेत. आरोग्य विभाग त्यासाठी मार्गदर्शक सूची तयार करतंय.

राज्यात स्विमिंग पूल, जिम, शॉपिंग मॉल लवकरच सुरु करण्यात येण्याची शक्यताय. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तसे संकेत दिलेत. आरोग्य विभाग त्यासाठी मार्गदर्शक सूची तयार करतंय. मात्र याचा अंतिम निर्णय  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार असल्याच आरोग्यमंत्र्यांनी म्हटलंय. बुधवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिलीये. राज्यात सध्या ३१ जुलै पर्यंत काही प्रमाणात लॉकडाऊन आहे.

मात्र, मिशन बिगिन अगेनअंतर्गंत अनेक उद्योगांना परवानगी देण्यात आली आहे. जास्तीत जास्त गोष्टी पुन्हा सुरु केल्या जात आहेत. त्यानुसार सध्या बंद असलेले स्विमिंग पूल, जिम आणि शॉपिंग मॉल सुरु करण्याबाबत राज्य सरकार विचार करत आहे. तसंच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांप्रमाणेच आम्हालाही रेल्वेने प्रवास करण्याची मुभा द्या, अशी मागणी सामान्य रेल्वे प्रवाशांकडून होत आहे. 

देशात आजही 45 हजारहून अधिक रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे देशाची रुग्णसंख्या आता बारा लाखाच्यापार गेलीय. आतापर्यतची ही सर्वाधिक रुग्णवाढ आहे.गेल्या काही दिवस 35 हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळून येत होते. मात्र गेल्या 24 तासांत तब्बल 45 हजारपेक्षा जास्त रुग्णांचं निदान झालंय. तर एका दिवसा अकराशेहून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. 

राज्यात काल कोरोना रुग्णांची विक्रमी वाढ झालीय. काल राज्यात 10 हजार 576 नवीन रुग्णांचं निदान झालंय. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 3 लाख 37 हजार 607 इतकी झालीय. 24 तासात कोरोनामुळे राज्यात 280 रुग्णांचा मृत्यू झालाय. बुधवारी एका दिवसात 5 हजार 552 रुग्ण बरे होऊन घरी परतलेत. यामुळे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 55.62 टक्के एवढं झालंय...राज्यात सध्या 1 लाख 36 हजार 980 रुग्ण उपचार घेतायत.


संबंधित बातम्या

Saam TV Live