105 वर्षांच्या विद्यार्थीनीने तब्बल 96 वर्षांनी परीक्षा देत मिळवले 98 गुण!

105 वर्षांच्या विद्यार्थीनीने तब्बल 96 वर्षांनी परीक्षा देत मिळवले 98 गुण!

तिरुअनंतपुरम : केरळमध्ये 105 वर्षांच्या विद्यार्थीनीने तब्बल 96 वर्षांनी चौथीची परीक्षा दिली अऩ् उत्तीर्णही झाल्या. राज्यामध्ये सर्वाधिक वय असलेल्या त्या विद्यार्थीनी ठरल्या असून, केरळ सरकारच्या वतीने नुकताच त्यांचा सत्कार करण्यात आला.

भगिरथी अम्मा (वय 105) असे या आजींचे नाव आहे. केरळमधील कोलम जिल्ह्यातील थ्रिक्करुवा गावात त्या राहतात. त्यांना सहा मुले व 16 नातवंडे आहेत. भगिरथी यांना तिसरीच्या परिक्षानंतर शाळा सोडावी लागली होती. तब्बल 96 वर्षांनी त्यांनी परिक्षा दिली. इयत्ता चौथीशी तुल्यबळ असलेल्या परीक्षेला भगिरथी मंगळवारी बसल्या होत्या.साक्षरता अभियानात त्यांनी शंभरपैकी 98 गुण मिळवले आहेत.

भगिरथी अम्मां यांना लहानपणी तिसरीनंतर शिक्षण सोडावे लागले होते. धाकट्या भावाच्या जन्मावेळी बाळंतपणात त्यांच्या आईला मृत्यूने गाठले. त्यामुळे लहान भावंडांची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली होती. विवाहानंतर त्या तिशीमध्ये असताना त्यांच्या पतीचे निधन झाले. यामुळे सहा मुलांचा सांभाळ करण्यासाठी कसरत करावी लागली.


कुटुंबाची जबाबदारी पडल्यामुळे त्या शिक्षणापासून दूर राहिल्या. पण, शिक्षणाची आवड होती. तब्बल 96 वर्षांनी पुन्हा एकदा त्या केरळ साक्षरता अभियानात सहभागी झाल्या आणि परिक्षा दिली. वयाची शंभरी ओलांडल्यानंतरही त्यांची स्मरणशक्ती, दृष्टी आणि श्रवणशक्ती अबाधित आहे.

Web Title: 105 year old granny from Kerala becomes oldest learner appears for Class iv examination

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com