ढोल ताशांचा निनाद,‘पुढल्या वर्षी लवकर या’चा जयघोष आणि लालबागच्या राजाला निरोप 

ढोल ताशांचा निनाद,‘पुढल्या वर्षी लवकर या’चा जयघोष आणि लालबागच्या राजाला निरोप 

गेली दहा दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर लाडक्या गणपती बाप्पाला भक्तीभावाने निरोप देण्यात आला.. भाविकांचा अमाप उत्साह, ढोल ताशांचा निनाद आणि ‘पुढल्या वर्षी लवकर या’ च्या गजरात लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आलं. सकाळी 9 वाजता लालबागच्या राजाचे गिरगाव चौपाटीवर विसर्जन झाले. तब्बल 21 तासांनंतर विशिष्ट तराफ्याच्या सहाय्याने लालबाग राजाला निरोप देण्यात आला. विसर्जनापूर्वी कोळी बांधवांकडून लालबाग राजाला सलामीसुद्धा देण्यात आली. मुंबईच्या विविध रस्त्यांवर फिरुन आणि भक्तांचा निरोप घेत लालबागच्या राजाचे सकाळी सहाच्या सुमारास गिरगाव चौपाटी येथे आगमन झाले. चौपाटीवर हजारो भाविकांच्या उपस्थितीत बाप्पाची आरती झाली.

Youtube Link : https://youtu.be/MmUkNbSHvUc

WebTitle : marathi news thousands of mumbaikas bid adieu to lalbaigcha raja ganesh immersion 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com