नागरिकत्व कायद्याविरोधात हजारो विद्यार्थी आज रस्त्यावर

नागरिकत्व कायद्याविरोधात हजारो विद्यार्थी आज रस्त्यावर

नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू झाल्यापासून देशभरात निदर्शने सुरू झालीत. ईशान्य भारतातून पेटलेली आंदोलनाची ही ठिणगी आता मुंबईत देखील पेटण्याची शक्यता आहे. धर्माच्या नावावर देशाचे तुकडे अमान्य असल्याचे म्हणत, विविध विद्यार्थी संघटनांनी मुंबईत आज आंदोलन पुकारलंय.

ऑगस्ट क्रांती मैदानात आज दुपारी हे विद्यार्थी 'भाजप सत्ता छोडो' आंदोलनाला सुरुवात करणार आहे. या आंदोलनाला सिने अभिनेता, निर्माता फरहान अख्तरनेही पाठिंबा दिला असून तोही विद्यार्थ्यांच्या या आंदोलनात सहभागी होणार आहे.

या आंदोलनाला राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनींसुद्धा पाठिंबा जाहीर केलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आंदोलक विद्यार्थ्यांना शांतात पाळण्याचं आवाहन केलंय. दरम्यान आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन, पोलिसांकडून खबरदारीचे सर्व उपाययोजना करण्यात येत आहे. या मोर्चावर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस ड्रोन आणि सीसीटीव्हीची मदत घेत आहेत.

देशभरात CAAविरोधात आंदोलन

आज राजधानी दिल्लीसह देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन केलं जातंय. इशान्येत हा कायदा पास होण्याच्या आधीपासून विरोध कायम आहे. तर कायदा लागू झाल्यानंतर लखनौ, दिल्ली, मुंबई सगळीकडे विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं.

 दक्षिणेतही या कायद्याला कडाडून विरोध होतोय. कर्नाटक, केरळ, तमिळनाडूमध्ये या कायद्याविरोधात आंदोलनं सुरु आहेत. कर्नाटकमध्ये सुरु असलेल्या तिव्र विरोधामुळे कलम 144 लागू करण्यात आलंय. दरम्यान आज या कायद्याविरोधात देशव्यापी आंदोलन पुकारण्यात आलंय. दुसरीकडे  मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानावर विरोधक CAA विरोधात आंदोलन करण्यात आलंय. शिवाय बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरही या मोर्चात सहभागी होणार असल्याचं कळत होतं. त्यानं तसं ट्विट केलंय.  फरहानने केलल्या ट्विटनंतर विद्यार्थ्यांचं त्याला समर्थन मिळालाय त्यामुळे आज हजारो विद्यार्थी ऑगस्ट क्रांती मैदानात उतरणार आहेत. या मोर्चावर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस ड्रोन आणि सीसीटीव्हीची मदत घेणारयत. दरम्यान विद्यार्थ्यांनी संयम आणि शांतता पाळण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं होतं.

जमावबंदीचे आदेश

दरम्यान नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरात हिंसाचार उफाळलाय.  डावे आणि मुस्लिम संघटनांनी दिलेल्या भारत बंदचे पडसाद. उत्तर प्रदेश, बिहार, बंगळुरूतही पाहायला मिळतायत. डाव्यांच्या या बंदला विरोधकांनीदेखील समर्थन दिलंय. शिवाय उत्तर प्रदेश, कर्नाटकतील अनेक मोठ्या भागातसुद्धा आक्रमक आंदोलनाला सुरुवात झालीय. दिल्लीच्या लाल किला, जामा मशीद, चांदणी चौक आणि विश्वविद्यालयातील प्रवेशद्वार बंद करण्यात आलं असून. अनेक भागात जमावबंदी लागू करण्यात आलीय. शिवाय 14 मेट्रो स्टेशन्सही बंद करण्यात आले आहेत. तसंच अनेक भागातील इंटरनेट आणि मेसेजिंग सेवाही खंडित करण्यात आली आहे. तसेच जामिया मिलिया इस्लामिया, जसोला विहार, शाहीन बाग आणि मुनिरका स्टेशनांवरही ट्रेन थांबवण्यास मज्जाव करण्यात आलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com