कोल्हापुरात SS गँगची दहशत; सावकारी, खंडणीतून अनेकांची लूट

संभाजी थोरात
सोमवार, 13 मे 2019

कोल्हापुरात एस एस गँग अर्थात सुरज साखरे गँगची दहशत गेल्या वर्षांमध्ये अचानक वाढली. काही वर्षापूर्वी एका भाड्याच्या घरात राहणारा फाळकुटदादा अशी सुरज साखरेची ओळख होती. मात्र त्यानं गेल्या पाच वर्षात खासगी सावकारी, वसुली, जुगार अड्ड्यांच्या माध्यमातून स्वतःची दहशत निर्माण केलीय. कोल्हापूरच्या रणजीत पाटील यांचं व्याजाच्या पैशातून अपहरण करुन मारहाण केल्यानंतर सुरज साखऱेची एस एस गॅंग उघडकीस आली. एखाद्या गरीब माणसाची गरज बघून पैसे द्यायचे आणि मग दहशत निर्माण करुन व्याजापोटी कित्येक पट रक्कम लुटायची.

कोल्हापुरात एस एस गँग अर्थात सुरज साखरे गँगची दहशत गेल्या वर्षांमध्ये अचानक वाढली. काही वर्षापूर्वी एका भाड्याच्या घरात राहणारा फाळकुटदादा अशी सुरज साखरेची ओळख होती. मात्र त्यानं गेल्या पाच वर्षात खासगी सावकारी, वसुली, जुगार अड्ड्यांच्या माध्यमातून स्वतःची दहशत निर्माण केलीय. कोल्हापूरच्या रणजीत पाटील यांचं व्याजाच्या पैशातून अपहरण करुन मारहाण केल्यानंतर सुरज साखऱेची एस एस गॅंग उघडकीस आली. एखाद्या गरीब माणसाची गरज बघून पैसे द्यायचे आणि मग दहशत निर्माण करुन व्याजापोटी कित्येक पट रक्कम लुटायची. कर्ज दिलेल्यांचा एखादा हप्ता थकला तरी अपहरण करायचं, घरी जाऊन धिंगाणा घालायचा, धमकावायचं असे अनेक प्रकार ही गॅंग करत होती.

जुना राजवाडा पोलिसांनी सुरज साखरे आणि त्याच्या साथीदारांवर 24 तासाच्या आत मोकांअतर्गंत कारवाई केलीय. सुरज साखरे भाजपाचा कार्यकर्ता आहे. तर त्याची पत्नी भाजपाची पदाधिकारी असल्याचं समोर आल्यानं खळबळ माजलीय.

सुरज साखरे हे हिमनगाचं एक टोक आहे. असे अनेक सुरज साखरे हे फक्त कोल्हापूर नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहेत. अशा सुरज साखरेंसारख्या माणसांच्या नांग्या ठेचणं गरजेचं आहे. 

Marathi News threat of Suresh sakhare gang in kolhapur  


संबंधित बातम्या

Saam TV Live