देहूरोडजवळ भरधाव कारचा भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 7 जुलै 2019

पुणे : भरधाव वेगात जाणारी स्विफ्ट कार ट्रकवर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज (रविवार) सकाळी देहूरोड बेंगळूर बाह्यवळण मार्गावर रावेत येथील हॉटेल सॅन्टोसासमोर घडला.

अभिषेक रवींद्र शर्मा (रा. काशीपुर, उत्तराखंड), पराग प्रवीण हेरेगावकर (रा. लोकमान्य कॉलनी, कोथरूड), सुरज राजेंद्र मांजरे अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर अन्य एकजण जखमी आहे. या भीषण अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 

हा अपघात इतका भीषण होता की ट्रकसोबत झालेल्या टक्कर नंतर अपघातग्रस्त कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. एकजण जखमी झाला असून त्याला नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. देहूरोड पोलिस घटनास्थळी पोहोचले असून अधिक तपास करीत आहे..

Web Title: three dead in accident on mumbai-pune highway

संबंधित बातम्या

Saam TV Live