राष्ट्रवादीचे तीन बेपत्ता आमदार दिल्लीहून परतले

राष्ट्रवादीचे तीन बेपत्ता आमदार दिल्लीहून परतले

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंडाळी केल्यानंतर काही आमदार जरी त्यांच्या मागे गेले असले तरी, ‘राष्ट्रवादी’तील काही बड्या नेत्यांचेदेखील नाव यामध्ये घेतले जात आहे. यामध्ये धनंजय मुंडे, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या तीन नेत्यांची फूस अजित पवारांना असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची रेनेसाँन्समध्ये भेट घेतली तेव्हा सुमारे पाऊण तास या दोघांनीही धनंजय मुंडे यांच्याशी स्वतंत्र बैठक घेऊन त्यांना सज्जड दम दिला असल्याचे समजते. 

धनंजय मुंडे यांनी आपण अजित पवार यांच्यासोबत नसून आपला पाठिंबा शरद पवार यांना असल्याचे जाहीर केले आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावंत आमदारांमध्ये धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत रेनेसाँन्स हॉटेलमध्ये वास्तव्य करणे म्हणजे उशाशी निखारा ठेवण्यासारखेच असल्याची बोलकी प्रतिक्रिया एका ज्येष्ठ आमदाराने या वेळी व्यक्‍त केली. 


विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे यांचे निवासस्थान असलेला ‘बी ४’ हा बंगला असल्याने आणि ती पक्षाची अधिकृत भूमिका असल्याचे वाटल्यानेच हे आमदार पहाटे बंगल्यावर पोचले होते. त्याठिकाणी धनंजय मुंडे यांची भेट जरी झाली नसली तरी मुंडे यांची भूमिका या सर्व परिस्थितीत संशयास्पद असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच २३ नोव्हेंबरला दिवसभर धनंजय मुंडे यांचा संपर्क पक्षातील नेत्यांनाही होत नव्हता. ते दिवसभर अजित पवारांसोबत असल्याची चर्चा होती, मात्र पक्षाने सायंकाळी बोलावलेल्या आमदारांच्या बैठकीला ते उपस्थित होते.


अजित पवारांसह धनंजय मुंडे, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या तिघांनीही शिवसेना काँग्रेससोबत जाण्याचे टाळण्याची भूमिका वारंवार घेतली होती. मात्र पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत हा प्रस्ताव फेटाळल्यानंतर तसेच महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी शरद पवार पुढाकार घेत असतानाही या चौघांकडून वेगवेगळ्या टप्प्यावर या प्रस्तावाचा आग्रह धरला जात असल्याने या चौघांच्या भूमिकेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले.

Web Title: NCP leaders may be supports Ajit Pawar for dispute in Party

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com