उद्धव ठाकरेंनी मराठ्यांसाठी घेतला 'हा' निर्णय

उद्धव ठाकरेंनी मराठ्यांसाठी घेतला 'हा' निर्णय

मुंबई : मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी  अनेक महत्वाचे निर्णय घेतलेत. गेल्या 10 दिवसांत पाच खटले मागे घेतलेत. त्यातच आता मराठ्यांना दिलासा देण्यासाठी, उद्धव ठाकरेंनी मोठं पाऊल उचललंय मुख्यमंत्री ठाकरेंनी स्थानिक कोर्टांना मराठा आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेले 288 खटले रद्द करण्याविषयी शिफारस केल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिलीय. ठाकरे सरकारच्या या निर्णयाचा मराठा समाजाच्या तीन हजार तरुणांना याचा फायदा होणार आहे. यापूर्वी आरे वृक्षतोडप्रकरणातील आंदोलन, नाणार प्रकल्पाविरोधातील आंदोलन, भीमा कोरेगांव हिंसाचारप्रकरण, शेतकरी आंदोलन आणि आता मराठा आंदोलनाशी संबंधित खटले ठाकरे सरकारने मागे घेतले आहेत.

यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी आरे वृक्षतोडप्रकरणातील आंदोलन, नाणार प्रकल्पाविरोधातील आंदोलन, भीमा कोरेगांव हिंसाचारप्रकरण, शेतकरी आंदोलन आणि आता मराठा आंदोलनाशी संबंधित खटले ठाकरे सरकारने मागे घेतले आहेत. एका वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, तीन खटले अपुऱ्या दस्ताऐवजांअभावी अडकून पडले आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, मराठा आंदोलनाशी संबंधीत ३५ खटले मागे घेतले जाऊ शकत नाहीत. कारण यामध्ये आंदोलनादरम्यान ५ लाख रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. तसेच काही प्रकरणांमध्ये पोलीस आणि सरकारी कर्मचारी जखमी झाले होते. 

दरम्यान, सरकारच्या या निर्णयामुळे ३००० मराठा आंदोलक तरुणांना दिलासा मिळणार आहे. यासाठी सरकारने जिल्हा पोलीस प्रमुख आणि पोलीस आयुक्त यांच्यामार्फत स्थानिक कोर्टांकडे शिफारस पाठवली आहे. आता यावर कोर्ट काय निर्णय घेते त्यावर सरकारच्या निर्णयाचे यश अवलंबून आहे.

मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी नुकतेच म्हटले होते की, महाविकास आघाडीचे सरकार भीमा कोरेगाव हिंसाचाराशी संबंधित प्रकरणांत चुकीच्या पद्धतीने अडकवलेल्या लोकांना दिलासा देण्याचा विचार करीत आहे. त्याचबरोबर सरकारने नाणारशी संबंधीत आंदोलनातील २३ प्रकरणंही मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title - three thousand maratha agitators consoled chief minister thackeray recommends withdrawal crime

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com