गर्लफ्रेंडला फिरवण्यासाठी चोरल्या बाईक्स..

गर्लफ्रेंडला फिरवण्यासाठी चोरल्या बाईक्स..

प्रेमात कोण काय करेल याचा नेम राहिला नाहीय. कारण पिंपरीत ३ प्रेमवीरांनी गर्लफ्रेंड्सना फिरवण्यासाठी चक्क बाईक्स चोरल्यात. बरं एक दोन नव्हे तर तब्बल १४ बाईक्स या चोरांनी चोरल्यात.

या तिघांकडे गाडी नव्हती आणि विकत घेण्याएवढे पैसेही नव्हते त्यामुळं या तिघांनी शक्कल लढवत प्लान केला. आणि बाईक्स चोरण्याचा सपाटा लावला. पप्प्या सोळंखी, सोनू जाधव, आणि आशिष जाधव अशी त्यांची नावं आहेत. हे तिघेही २० ते २२ वयोगटातले आहेत. पोलिसांनी या तिघांचा माग काढून तिघांनाही बेड्या ठोकल्या. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकानं केली. त्यांच्याकडून सहा लाखांच्या चौदा दुचाकी जप्त करण्यात आल्या असून बारा गुन्हे उघडकीस आलेत. 

तुमच्यासाठी काय पण म्हणत या प्रेमविरांनी बाईक्स चोरल्या खऱ्या पण शेवटी पोलिसांच्या जाळ्यात अडकल्यानंतर जेलमध्ये जावं लागलंय. त्यामुळं प्रेमासाठी अशा भंपक गोष्टी करणाऱ्यांना प्रेम इतकं उथळ नसतं हे कधी कळणार ?

WebTitle : marathi news three youngsters becomes bike thief for girlfriends  


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com