#TikTok ऍप डिलीट करा; केंद्र सरकारकडून गुगल आणि ऍपलला निर्देश

अमोल कविटकर, पुणे
मंगळवार, 16 एप्रिल 2019

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सध्या सगळ्यांच्या आवडीचं ऍप कोणतं असं विचाराल तर एकमुखानं टिक टॉकचं नाव घेतलं जाईल. सिनेमाचे डायलॉग्स असो, गाणी असो किंवा म्युझिक, १५-३० सेकंदात फुल्ल धम्माल या टिक टॉकवर सुरु असते. सर्वसामान्यचं नाही तर सेलिब्रिटींनाही या ऍपनं भूरळ घातलीय.

दरदिवशी वाढत जाणाऱ्या फॉलोअर्समुळं तर प्रत्येकालाच आपण सेलिब्रिटी असण्याचा फिल येतोय, पण आता हे सगळं बंद होणाराय. कारण टिक टॉक ऍप गुगल आणि ऍपलवरुन डिलीट करायचे निर्देश केंद्र सरकारनं दिलेत. भारतात टीक टॉकचा गैरवापर होत असून अश्लिल मजकूर अपलोड करण्यात येतोय. या अश्लिल मजकुरावर तात्काळ बंदी आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं कळतंय. पण केंद्राच्या या निर्णयामुळं तरुणाईमध्ये नाराजी पसरलीय. 

टिक टॉकच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी अशी की ज्यांच्याकडे हे ऍप डाऊनलोड आहे, त्यांना चिंता करायची गरज नाहीय. कारण त्यांना या ऍपचा वापर करता येणाराय. फक्त नव्यानं आता कोणालाही टिक टॉक डाऊनलोड करता येणार नाहीय.

WebTitle : marathi news tik tok app banned in india 

संबंधित बातम्या

Saam TV Live