टाईम मासिकानी केली मोदींवर टीका; दानावेंनी केलं अभिनंदन

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 12 मे 2019

औरंगाबादः आंतरराष्ट्रीय मासिक टाईमच्या कव्हर पेजवर मोदींचा फोटो नुकताच झळकला. टाईमच्या मासिकावर आपल्या देशाच्या पंतप्रधानाचे छायाचित्र प्रसिध्द होणे तशी अभिनंदनाची बाब. पण यावेळी मात्र हा फोटो "इंडियाज डिव्हायडर इन चीफ' या शिर्षकाखाली प्रसिध्द करण्यात आला आहे. मोदींना `भारताला विभागणारा प्रमुख' असे संबोधण्यात आल्यामुळे हा फोटो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. 

औरंगाबादः आंतरराष्ट्रीय मासिक टाईमच्या कव्हर पेजवर मोदींचा फोटो नुकताच झळकला. टाईमच्या मासिकावर आपल्या देशाच्या पंतप्रधानाचे छायाचित्र प्रसिध्द होणे तशी अभिनंदनाची बाब. पण यावेळी मात्र हा फोटो "इंडियाज डिव्हायडर इन चीफ' या शिर्षकाखाली प्रसिध्द करण्यात आला आहे. मोदींना `भारताला विभागणारा प्रमुख' असे संबोधण्यात आल्यामुळे हा फोटो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. 

परंतु फोटोचा विषय आणि तो का प्रसिध्द झाला हे समजून न घेताच त्यांचे अभिनंदन करणारे ट्‌वीट भाजपचे प्रदेशाध्यक्ष, खासदार रावसाहेब दानवे यांनी आपल्या ट्‌वीटर पेजवरून केले. " मोदी है तो मुमकीन है' या घोषणेचा वापर करत दानवे यांनी ट्‌वीटवरून मोदींचे अभिनंदन केले. काहीवेळातच चूक लक्षात आल्यानंतर हे ट्‌वीट आता हटवण्यात आले आहे. 

रावसाहेब दानवे कधी गमतीशीर तर कधी चुकीच्या विधानांमुळे नेहमची चर्चिले जातात. ऐन लोकसभा निवडणुकीत राज्यातील काही मतदारसंघातील सभांमध्ये त्यांनी "पाकिस्तानने भारताचे चाळीस अतिरेकी मारले' असा चुकीचा उल्लेख करत स्वतःवर टीका ओढावून घेतली होती. सोलापूरच्या सभेनंतर हीच चूक पुन्हा त्यांनी औरंगाबादेत केल्यानंतर मात्र पक्षाने याची गंभीर दखल घेतली. त्यानंतर मात्र राज्यात रावसाहेब दानवे यांचे एकही भाषण झाले नाही. अर्थात त्यामागे त्यांची प्रकृती बरी नसल्याचे कारण सांगितले गेले. 

आता टाईम मासिकाच्या मुखपृष्ठावर नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र प्रसिध्द झाल्याबद्दल घाईत त्यांचे अभिनंदन करणारे चुकीचे ट्‌विट दानवे यांनी नुकतेच केले. त्यामुळे ते पुन्हा वादात अडकण्याची शक्‍यता आहे. चौकीदार रावसाहेब पाटील दानवे या आपल्या ट्‌विटर अकाऊंटवरून दानवे यांनी हे चुकीचे ट्‌वीट केले आहे. 

टाईम मासिकावरील मोदींच्या फोटोचा वापर करत " अमेरिकेच्या प्रख्यात टाईम मॅगझीनने पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना इंडियाज डिव्हायडर इन चीफ" ही उपाधी देऊन गौरविण्यात आले. भारतासाठी अभिमानाची बाब, मोदी है तो मुमकीन है' या घोषवाक्‍यासह पुर्ण जगात साहेबांचा डंका असा उल्लेख देखील या ट्विटमध्ये करण्यात आला आहे. हे चुकीचे ट्‌वीट पोस्ट होताच रावसाहेब दानवे यांच्यावर चोहोबाजूंनी टिकेचा भडीमार सुरू झाला. गंभीर चूक झाल्याचे लक्षात येताच काही मिनिटांतच हे ट्‌विट दानवे यांच्या पेजवरून हटवण्यात आले.

Web Title: Time magzine criticizes Modi and Raosaheb Danave tweeted congratulations


संबंधित बातम्या

Saam TV Live