केरळमध्ये एका महाविद्यालयात बुरख्यावर बंदी 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 2 मे 2019

तिरुअनंतपुरम : दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीलंकेत बुरख्यावर बंदी घातली गेली आहे. भारतातसुद्धा याच मुद्द्यावरून चांगलंच राजकारण रंगत असतानाच  केरळमधील एका महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या बुरखा घालण्यावर बंदी घातली गेलीये. केरळमधील मल्लपुरम येथे असलेल्या अल्पसंख्याक महाविद्यालयात ही बंदी घालण्यात आली आहे. हे महाविद्यालय मुस्लिम एज्युकेशन सोसायटीमार्फत चालवले जाते. 

श्रीलंकेत झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीलंका सरकारने चेहरा झाकणाऱ्या सर्व प्रकारच्या पेहरावांवर बंदी घातलीये. शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपल्या 'सामना' या वृत्तपत्रातील अग्रलेखातून बुरखा आणि नकाब बंदीची मागणी केलीये. मात्र, नंतर ही वर्तमानपत्राची व्यक्तिगत भूमिका असल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले. 

संबंधित बातम्या

Saam TV Live