ग्राहकांच्या डोक्यावर पडणार ‘टायटल इन्शुरन्स’चा अतिरिक्त बोजा; घरांच्या किंमती भडकणार

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

ही बातमी आहे घर घेण्याचं स्वप्नं पाहणाऱ्यांच्या स्वप्नांना धक्का देणारी. मुंबईत घर घेण्याचा विचार करणाऱ्यांच्या खिशावर आता आणखीन बोझा पडणार आहे.. मुंबईतील घरांच्या किंमतीचा लवकरच भडका उडणार आहे. आधीच 98 टक्के लोकांना घराच्या किमती परवडत नसताना आता सरकारने ‘रेरा’ कायद्यातर्गंत टायटल इन्श्युरन्स नावाचा नवा फेरा आणला आहे. 

हा इन्शुरन्स काढणे जमीनमालक आणि विकासक यांना सक्तीचे होणार असल्याने आपसुकच घरांच्या किमती आणखी भडकणार आहेत. परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठीच देशातही असा इन्शुरन्स असावा, अशी टूम रेरा कायद्यात आहे. इन्शुरन्सचे हे लचांड आता सामान्य ग्राहकांच्या डोक्यावर राहणार आहे. विशेष म्हणजे टायटल इन्शुरन्सची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.

WebTitle : marathi news title insurance real estate house rates to increase 

संबंधित बातम्या

Saam TV Live