असा असेल मंत्रिमंडळ विस्तार...आदित्य ठाकरेंना संधी तर तानाजी सावंतांना डच्चू

साम टीव्ही
सोमवार, 30 डिसेंबर 2019

जुन्यांप्रमाणेच नव्यांनाही मिळणार संधी 
मुंबई - राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडणार आहे. या पार्श्‍वभूमीवर तिन्ही पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. आजच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून संभाव्य मंत्र्यांची यादी जाहीर करम्यात आली आहे. अजित पवारांसह 13 जणांची यादी साम टीव्हीकडे आली असून, उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी अजित पवारांवर सोपवली जाण्याची शक्यता आहे... तसंच अनुभवी दिलीप वळसे पाटलांसह, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, संजय बनसोडे यांचीही वर्णी लागण्याची शक्यता आहे.

नव्या मंत्रिमंडळात युवा आणि अनुभवी अशा दोन्ही नेत्यांना संधी दिली जाण्याची शक्‍यता आहे. मंत्रिमंडळामध्ये प्रादेशिक तसेच सामाजिक समतोल साधण्याचाही प्रयत्न केला जाईल. तत्पूर्वी 28 नोव्हेंबर 2019 रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयंत पाटील, छगन भुजबळ, कॉंग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि डॉ. नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. आता आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचे 13 मंत्री शपथ घेणार आहेत, त्यामध्ये 10 कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्र्यांचा समावेश असू शकतो. राष्ट्रवादीचे 13 मंत्री शपथ घेणार आहेत, त्यामध्ये दहा कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्री शपथ घेऊ शकतात. कॉंग्रेसचे 12 मंत्री शपथ घेणार आहेत, त्यामध्ये 10 कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात काही खाती रिक्त ठेवण्यात येतील, अशी माहिती आधी मिळत होती. मात्र, आता सर्व खाती भरण्यात येतील, असे सांगितले जात आहे.

आदित्य ठाकरेंना संधी तर तानाजी सांवंतांचा पत्ता कट

युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे हे देखील आज मंत्रीपदाची शपथ घेणारेत. त्यंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय. तान्हाजी सावंत यांचा पत्ता कट झाला. तान्हाजी सावंत यांना मंत्रिपद मिळणार होतं पण त्यांच्या ऐवजी आदित्य ठाकरेंना कॅबिनेट मंत्रिपद मिळणारेय. ठाकरे सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळात आमदार आदित्य ठाकरेंना स्थान मिळणारे. आदित्य ठाकरे मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती साम टीव्हीच्या हाथी लागली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी रात्री उशिरा मंत्र्यांच्या नावांची यादी राजभवनावर पाठवली. त्यामध्ये आदित्य यांचं नाव आहे. आदित्य यांचं नाव गुप्त ठेवण्यात आलं होतं. शेवटपर्यंत कोणालाही आदित्य मंत्रिमंडळात येणार आहेत याचा सुगावा लागू दिला नव्हता. मात्र राज्यपालांकडे जेव्हा रात्री उशिरा यादी गेली, त्यात आदित्य ठाकरे यांचं नाव कॅबिनेट मंत्री म्हणून यादीत असल्याची माहिती आहे. 

Web Title - Marathi news Today Cabinet Expansion 

संबंधित बातम्या

Saam TV Live