शरद पवारांच्या वाढदिवसानिमीत्त NCPकडून बळीराजा कृतज्ञता दिनाचं आयोजन

शरद पवारांच्या वाढदिवसानिमीत्त NCPकडून बळीराजा कृतज्ञता दिनाचं आयोजन

मुंबई - दरम्यान, आज पवारांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीच्या वतीने ळीराजा कृतज्ञता दिन साजरा केला जाणार आहे. 80 व्या वर्षात पदार्पण करत असल्याने शेतकऱ्यांसाठी कृतज्ञता कोष तयार करुन 80 लाखांचा कोष सुपुर्द केला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार ८०व्या वर्षात पदार्पण करीत असून, त्यांचा हा वाढदिवस बळिराजा कृतज्ञता दिवस म्हणून राज्यभरात साजरा होणार आहे. यासाठी ‘राष्ट्रवादी’च्या वतीने ८० लाख रुपयांचा बळिराजा कृतज्ञता कोश तयार करण्यात आला आहे. हा जमा झालेला निधी राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या वतीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरण्यात येणार आहे.

राज्याच्या व देशाच्या राजकारणात सलग पन्नास वर्षे सक्रिय असलेले शरद पवार आज ८०व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रचाराचे केंद्रस्थान बनलेल्या पवार यांना ८०व्या वाढदिवशी शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते व चाहते मुंबईत दाखल होत आहेत. पवार यांचा हा ८०वा वाढदिवस बळिराजा कृतज्ञता दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यासाठी राज्यभरात विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. युवक काँग्रेसच्या वतीने ‘परिवर्तनाचा महानेता’ या विषयावर वक्‍तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहेत. शिवाय संपूर्ण मुंबईतील रुग्णालयात फळवाटप केले जाणार आहे. मुंबई युवकांच्या वतीने सर्व रुग्णालय परिसरात स्वच्छता अभियान हाती घेण्यात आले आहे.

शुभेच्छांचे लक्षवेधी फलक
शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यभरात भव्य शुभेच्छा फलक लावले आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरही पवार यांच्या शुभेच्छांचे लक्षवेधी फलक झळकत आहेत.

Web Title: sharad pawar birthday celebration

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com