विविध पालख्या पंढरपूरला रवाना होणार... मात्र कोरोनामुळे काय आहे परिस्थिती वाचा...

साम टीव्ही
शुक्रवार, 12 जून 2020

आज संत तुकाराम महाराज यांची तर उद्या ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरकडे रवाना होणारे. मात्र यावेळी सोहळयाला मंदीर परिसराच्या आत जास्तीत जास्त 50 लोकांनाच प्रवेश देण्यात आलाय.

आज संत तुकाराम महाराज यांची तर उद्या ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरकडे रवाना होणारे. मात्र यावेळी सोहळयाला मंदीर परिसराच्या आत जास्तीत जास्त 50 लोकांनाच प्रवेश देण्यात आलाय. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी तसे आदेश दिले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदा पायी वारी सोहळा असणार नाही. मात्र पालखी सोहळा प्रस्थानावेळी उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आलेल्या सर्व नागरिकांनी मास्क वापरणं, स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण या नियमांचं पालन करणं बंधनकारक असेल. 

जगतगुरू संत तुकाराम महाराज यांचा आज पालखी प्रस्थान सोहळा आहे. या सोहळ्यावर आणि एकंदरीत आषाढी वारीवर कोरोनाचं संकट आहे. त्यामुळे यंदाचा पालखी सोहळा हा मोठ्या प्रमाणात वेगळा असणार आहे. तुकाराम महाराजांच्या पादुका या मंदिर परिसरातच ठेवण्यात येणार आहेत. वारी सोहळा रद्द झालेला असला तरी पालख्यांचं प्रस्थान मात्र होणार आहे. आज तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान होतंय, तर उद्या ज्ञानोबांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा पार पडणार आहे. देहुमध्ये संत तुकाराम पालखी सोहळा छोटेखानी आयोजित करण्यात आला असुन प्रशासनाने पन्नास वारकरी यांना मंदिरात प्रवेश दिला आहे.. सकाळी मुख्य मंदिरात अभिषेक सोहळ पार पडला.त्यानंतर टाळमृदुगाच्या गजरात पालखी मंदिरात आणण्यात आली.त्यानंतर काल्याचे किर्तन करण्यात आले. दुपारी दोन वाजता मंदिरातच महाराजांच्या पादुका आणण्यात येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.

पैठणच्या संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे...मात्र, ही पालखी पैठणमधील नाथ समाधी मंदिरात 18 दिवस मुक्कामी असणार आहे...पालखीसोबत केवळ 20 वारकरी राहणार आहेत...त्यानंतर वाहनाने आषाढी एकादशीला पालखी जाईल. आज पैठण गावातील नाथ मंदिरात संत एकनाथ महाराजांच्या पालखीला सजवून आणि विधिवत पूजन करून पालखीत नाथांच्या पादुका ठेवण्यात येतील. त्यानंतर नाथांच्या पालखीची गावातील नाथ मंदिरापासून समाधी मंदिरापर्यंत पायी मिरवणूक काढण्यात येणार आहे. समाधी मंदिरात ही पालखी भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आली...संध्याकाळी नाथांची पालखी गागाभट्ट चौकातील पालखी ओट्यावर वारकरी, भाविक व गावातील नागरिकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दर्शनासाठी भाविकांनी गर्दी होऊ नये याची पूर्णतः खबरदारी घेण्यात आलीय.


संबंधित बातम्या

Saam TV Live