टोमॅटो उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा संकटात

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 15 सप्टेंबर 2019

मराठवाड्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय. पंधरवड्यापूर्वी ४० ते ५० रुपये किलो दराने विकणाऱ्या टोमॅटोला आज केवळ चार ते पाच रुपये भाव मिळत असल्याने टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलीय. 

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर आणि गंगापूर तालुक्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातला टोमॅटो रस्त्याच्या कडेला फेकून दिलाय. या लालभडक टोमॅटोचे डोंगरांचा लालभडक चिखल रस्त्यावर पाहायला मिळालाय. 

गणपती आणि महालक्ष्मीचा सण संपताच भाजीपाल्याचे भाव कमी झाल्यानंतर त्याचा सर्वाधिक फटका हा टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय. टोमॅटोची आवक वाढली आणि सध्याच्या पावसाळी वातावरणामुळे टोमॅटो खराब होण्याचे प्रमाण वाढल्याने टोमॅटोला बाजारात भाव मिळत नाही.

दुसऱ्या राज्यात पाऊस पडत असल्यामुळे तिथूनही मागणी कमी झाली आहे. बाजारामध्ये चार ते पाच रुपये किलो असा भाव मिळत असल्याने बाजारात नेऊन गाडीभाडेही निघत नसल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर टाकून दिला आहे.

सध्या औरंगाबादच्या बाजार समितीमध्ये टोमॅटोच्या एका कॅरेटला ७० ते १०० इतका भाव मिळतोय. यातून लागवड कर्ज, मजुरी, वाहतूक खर्च वजा केल्यास पदरात काहीच पडत नसल्यानं शेतकऱ्यांच्या हाती निराशा आली आहे.

WebTitle : marathi news tomato producer farmers in maharashtra face problem of rate decline  

संबंधित बातम्या

Saam TV Live