शिधा विभागातच तूरडाळीला फुटले पाय.. अधिकारी, दलालांचे धाबे दणाणले.

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

सरकारी तूर डाळीच्या काळ्या बाजाराचा सामने भांडा फोड केल्यानंतर या डाळीच्या काळ्या धंद्यातील वाटा शिधा विभागातून जात असल्याचं उघड झालंय.

सरकारी तूर डाळीच्या काळ्या बाजाराचा सामने भांडा फोड केल्यानंतर या डाळीच्या काळ्या धंद्यातील वाटा शिधा विभागातून जात असल्याचं उघड झालंय. या प्रकरणी पणन विभागाच्या पथकानं केलेल्या चौकशीत डाळीच्या रिकाम्या पाकिटाची मुळे मुंबईतच असल्याचं स्पष्ट झालं आहे. 

साम टीव्हीनं तुर डाळीच्या रिकाम्या झालेल्या पाकीटांची बातमी दाखवल्यानंतर सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी चौकशीचं आश्वासन दिलं होतं. दरम्यान आता चौकशीमध्ये हा सगळा प्रकार मुंबईतूनच झाला असल्याचं समोर आलंय. 

सरकारी तूरडाळींचीय रिकामी पाकीटं जिथं मिळाली, ती जागा आम्ही चौकशी पथकाला दाखवली. त्यानंतर या पथकांनी तेथून ताब्यात घेतलेल्या पाकीटावरील नाव आणि बॅच क्रमांकामुळे या डाळींचे शिधावाटप पत्रिकांनी वाटप झाल्याचे स्पष्ट झालंय. पाकिटावरील बॅच क्रमांकावरुन ही पाकिचं कोणत्या गोदामात आणि तेथून मुंबईत कुठे वितरीत झाली, हे देखील वितरीत झाले. याप्रकरणी केलेल्या चौकशीचा अहवाल आज मार्केटिंग फेडरेशच्या संचालकांना दिला जाणार आहेत. त्यामुळे आता दोषी अधिकारी आणि दलालांवर काय कारवाई होते, हे पाहणं महत्त्वाचंय.

WebTitle : marathi news toor scam maharashtra saam tv news investigation 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live