21 हजार टन डाळ शिधावाटप दुकानांतून काळ्या बाजारात गेल्याचे उघड

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

'साम'ने "तूरडाळीच्या गैरव्यवहाराची बरणी' फोडल्यानंतर "महाराष्ट्र स्टेट ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन'ने मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात जुलैच्या शेवटच्या आठवड्यात. तसेच या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाठवलेली तब्बल 21 हजार टन डाळ शिधावाटप दुकानांतून काळ्या बाजारात गेल्याचे उघड झाले आहे.

या सौद्यात दुकानदार आणि संबंधित अधिकाऱ्यांनी दलालांमार्फत कोट्यवधी रुपये जमवले. ही डाळ गुजरात, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये पाठविण्यात आली. मात्र रेशनिंग नियंत्रकांनी ही डाळ दुकानांमधून थेट ग्राहकांच्या घरातच गेल्याचा दावा केला आहे.

'साम'ला मिळालेल्या माहितीनुसार मार्केटिंग फेडरेशनने शिधावाटप विभागाकडे पाठवलेली डाळ मुंबई आणि ठाणे परिसरातील चार हजारांहून अधिक दुकानांना पाठविण्यात आली. प्रत्येक दुकानाला सरासरी पाच हजार किलो डाळीचे वाटप करण्यात आले; मात्र ती डाळ ग्राहकांना न देता तिची पाकिटे फोडून तो माल काळ्या बाजारात विक्रीसाठी पाठविण्यात आला.

WebTitle : marathi news toor scam mumbai black marketing of toor pulses 

संबंधित बातम्या

Saam TV Live