तूर घोटाळा प्रकरणी चौकशी होणार, दोषी आढळल्यास निलंबन अटळ - सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

राज्यातील विक्रमी तूर उत्पादनानंतर तूर खरेदी आणि भरडाईपासून सुरू झालेली गैरव्यवहारांची मालिका आता तूर विक्रीपर्यंत पोचली आहे. ३५ रुपये किलोने विक्री अपेक्षित असलेली शासकीय तूर पिशव्या फाडून खुल्या भावाने विकली जात असल्याचा संशय आहे.

शासकीय तुरीच्या रिकाम्या पिशव्यांचा ढीगच  मुंबईत सापडला आहे. यामागे तूरडाळीचे मोठे रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे पणन विभागातील अतिवरिष्ठ सूत्रांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात येतील असं आश्वासन सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुखांनी दिले आहेत. 

YouTubehttps://youtu.be/-WIbIZ3G0Ms 

WebTitle : तूर घोटाळा प्रकरणी चौकशी होणार - सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख

संबंधित बातम्या

Saam TV Live