साबण, टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर ?

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

सोशल मीडियावर एक धक्कादायक दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय. टूथपेस्ट आणि साबणामुळं कॅन्सर होऊ शकतो असा दावा करण्यात आलाय. सकाळी उठल्यानंतर फ्रेश होण्यासाठी दातांना टूथपेस्ट लावतो आणि अंघोळ करताना अंगाला साबणही लावतो. दोन्ही वस्तू महत्त्वाच्या असून, दररोज त्याचा आपण वापर करतो.

पण, यामुळं कॅन्सरसारखा भयानक आजार होऊ शकतो असा दावा करण्यात आलाय. सगळ्यांच्याच गरजेचा विषय असल्यानं याचं सत्य सांगणं गरजेचं आहे. त्यामुळं आमच्या प्रेक्षकांना याचं सत्य सांगण्यासाठी व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली...पण, व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहा.

साबण आणि टूथपेस्टमुळं कॅन्सर होऊ शकतो असं एका रिसर्चमधून सिद्ध झालंय.ऍन्टी बॅक्टेरिअल आणि ऍन्टी फंगल तत्व ट्रायक्लोसनच्या वापरामुळं मोठ्या आतड्यांना सूज येते.त्यामुळं कॅन्सरसारख्या रोगांनाही आमंत्रण मिळतं. 

हा धक्कादायक दावा करणारा मेसेज पाहून आम्हालाही धक्काच बसला. विशेष म्हणजे, साबण आणि टूथपेस्ट प्रत्येकजण वापरतो. पण, या दाव्यामुळं सगळ्यांच्याच मनात भीती निर्माण झालीय. टूथपेस्ट आणि साबणामुळं कॅन्सर होऊ शकतो मग आता दातांची स्वच्छता करायची कशी? अंघोळ करताना साबण वापरायचा की नाही.? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत. त्यामुळं आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी केली.

आम्ही पडताळणी करत असताना अमेरिकेच्या मॅसाचुएट्स-एमहेस्र्ट युनिवर्सिटीतील प्रोफेसर गुओडोंग झांग यांनी हा दावा केलाय स्पष्ट झालं. पण, यावर रिसर्च करताना ट्रायक्लोसनचा प्रयोग उंदरांवर करण्यात आला होता.

थोड्या वेळासाठी ट्रायक्लोसनच्या फार कमी प्रमाणामुळेही उंदराच्या आतड्यांना सूज येऊ लागली आणि आतड्यांशी संबंधित आजार वाढू लागला. कालांतरानं आतड्यांशी संबंधित कॅन्सरही उंदरांमध्ये दिसून आला. पण, माणसालाही असं होऊ शकतं का? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी संजय डाफ हे कॅन्सर एक्सपर्ट डॉक्टर जयप्रकाश बरासकर यांना भेटले. त्यांना व्हायरल मेसेज दाखवला आणि टूथपेस्ट, साबणामुळं कॅन्सर होऊ शकतो का हे जाणून घेतलं.

हा प्रयोग उंदरावर करण्यात आला. अजूनही माणसावर हा प्रयोग करण्यात आलेला नाही. ट्रायक्लोसनचं जास्त प्रमाण शरीरात गेलं तर कॅन्सर होऊ शकतो असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. पण, अजूनपर्यंत सिद्ध झालेलं नाही. तरीदेखील काळजी घेणं गरजेचं आहे...त्यामुळं आमच्या पडताळणीत टूथपेस्ट आणि साबणामुळं कॅन्सर होऊ शकतो हा दावा सत्य ठरला.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live