सगळं पुणं सकाळपासून शहर वाहतूक कोंडीमध्ये अडकले

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 1 जुलै 2019

पुणे : पुणेकरांची सोमवार सकाळ आज पावसातच उजाडली आणि याच पावसामुळे सकाळपासून शहर वाहतूक कोंडीमध्ये अडकले आहे. या वाहतुकीचा सर्वाधिक फटका सिंहगड रोडवरून जाणाऱ्या प्रवाशांना बसला. 

पुणे : पुणेकरांची सोमवार सकाळ आज पावसातच उजाडली आणि याच पावसामुळे सकाळपासून शहर वाहतूक कोंडीमध्ये अडकले आहे. या वाहतुकीचा सर्वाधिक फटका सिंहगड रोडवरून जाणाऱ्या प्रवाशांना बसला. 

धायरीहून स्वारगेटला जाण्यासाठी एरवी 25 ते 30 मिनिटे लागतात. वाहतूक कोंडीमुळे हेच अंतर कापण्यासाठी किमान 50 मिनिटे लागत आहेत. पावसामुळे रस्त्यावर चारचाकी वाहनांची संख्या वाढली. त्यामुळे कोंडीमध्ये भर पडली. सिंहगड रोडवरील संतोष हॉल, दत्तवाडी, राजाराम पूल या भागात पोलिस वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. बहुतांश सिग्नल्सवर किमान तीन वेळा थांबावे लागत आहे. 

कर्वे रस्त्यावरही मेट्रोच्या कामामुळे सकाळी वाहतूक कोंडी झाली होती.

घोरपडी गावामध्ये  रेल्वे फाटकाजवळ प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. मागील एक तास सर्व रस्ता वाहतूक कोंडीत अडकला आहे.

#पुणे : सिंहगड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आहे. पावसामुळे रस्त्यावर चारचाकींची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडीत भर. पोलिस वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. तरीही एक सिग्नलवर किमान तीन वेळा थांबावे लागत आहे. #PuneTraffic @TrafficUpdates @PuneCityTraffic pic.twitter.com/kCSeUFww1Q

— eSakal.com (@SakalMediaNews) July 1, 2019

 

Web Title: Traffic jam in different parts of Pune


संबंधित बातम्या

Saam TV Live