गाडी अडविली म्हणून पोलिसाला घेतला चावा

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 29 फेब्रुवारी 2020

जळगाव : वाहतुकीचे नियम तोडून रॉंगसाईड जाणाऱ्या महिंद्रा पिकअप गाडीला वाहतुक पोलिसांनी अडविले. गाडी अडविल्याचा राग आल्याने वाहन चालकाने पोलिसांशी हुज्जत घातली. यात एका पोलिस कर्मचाऱ्याचे कपडे फाडले तर एका पोलिसाच्या पायाच्या पोटरीला दोन वेळेस कडाळून चावा घेतल्याचा प्रकार घडला. सदर घटना आकाशवाणी चौकात सात- साडेसात वाजेच्या सुमारास घडली. 

जळगाव : वाहतुकीचे नियम तोडून रॉंगसाईड जाणाऱ्या महिंद्रा पिकअप गाडीला वाहतुक पोलिसांनी अडविले. गाडी अडविल्याचा राग आल्याने वाहन चालकाने पोलिसांशी हुज्जत घातली. यात एका पोलिस कर्मचाऱ्याचे कपडे फाडले तर एका पोलिसाच्या पायाच्या पोटरीला दोन वेळेस कडाळून चावा घेतल्याचा प्रकार घडला. सदर घटना आकाशवाणी चौकात सात- साडेसात वाजेच्या सुमारास घडली. 

शहरातील प्रमुख रस्ते आणि शहरातून गेलेल्या महामार्गावर सायंकाळी सहानंतर मोठ्या प्रमाणात रहदारी असते. यामुळे बऱ्याचदा वाहतुकीची कोंडी देखील होत असते. अशात वाहतुकीचे नियम तोडून जाणारे देखील अनेक असतात. सिग्नल बंद असताना तोडून सुसाट जाणे तसेच रॉंगसाईडने जात असतात. बऱ्याचदा पोलिसांदेखात असे प्रकार होत असतात. असाच प्रकार आकाशवाणी चौकातील दत्त मंदिराजवळून रॉंगसाईडने महिंद्रा पिकअप गाडी जात असल्याचा घडला. येथे सेवा बजावत असलेल्या पोलिसांनी गाडीला रोखले असता, वाहन चालकाने पोलिसांशी हुज्जत घातली. 

चार पोलिसांशी हुज्जत 
आकाशवाणी चौकातून आज (ता.28) सायंकाळी सात- साडेसातच्या सुमारास दीपक प्रल्हाद बिऱ्हाडे हा महिंद्रा पिकअप गाडी रॉंगसाईडने घेवून जात होता. यावेळी आकाशवाणी चौकातील सिग्नलवर पोलीस नाईक प्रशांत मोरे, पंडित साळी कपडे शर्ट पाडले, गणेश पाटील आणि शशिकांत मराठे सेवा बजावत होते. यावेळी प्रशांत मोरे यांनी गाडी आडवली असता गाडी चालक दीपक याने धिंगाणा घालत पोलिसांशी हुज्जत घातली. यात पंडीत साळी यांचे शर्ट फाडले तर प्रशांत मोरे यांच्या पायाच्या पोटरीला जोरदार चावा घेत पडून जाण्याचा प्रयत्न केला. चालक दीपक बिऱ्हाडे यास पोलिसांनी ताब्यात घेत जिल्हा पेठ पोलिसात जमा केले आहे. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशन गुन्हा नोंदविण्याची कारवाई सुरू आहे. 

कंपनीची नवी गाडी 
कंपनीच्या नवीन गाड्या शोरूमला पोहचविण्याचे काम होत असते. त्यानुसार दीपक बिऱ्हाडे हा महिंद्रा पिकअप ही नवीन गाडी घेवून धुळ्याकडून भुसावळला जात होते. दीपक बिऱ्हाडे हे जळगावातील समतानगरातील रहिवासी असल्याने त्यांनी आकाशवाणी चौकातून गाडी रॉंगसाईडने जोरदार आणली. या दरम्यान सदर प्रकार घडला. 

 

Web Title: marathi news traffic police got bit by man for stopping his bike


संबंधित बातम्या

Saam TV Live