ViralSatya | इथे ट्रेन आणि कार एकाच ट्रॅकवर...

साम टीव्ही न्यूज
शुक्रवार, 27 डिसेंबर 2019

ट्रेन क्रॉसिंग असल्यावर रस्त्यावर फाटक पडतो. गाड्या थांबवल्या जातात. पण, या ठिकाणी ट्रेन आली की ट्रेन जाण्याआधी गाड्या जातात...हा सगळा प्रकार पाहून तुम्हीदेखील हैराण व्हाल. पण, हे खरं आहे.

ट्रेन क्रॉसिंग असल्यावर रस्त्यावर फाटक पडतो. गाड्या थांबवल्या जातात. पण, या ठिकाणी ट्रेन आली की ट्रेन जाण्याआधी गाड्या जातात...हा सगळा प्रकार पाहून तुम्हीदेखील हैराण व्हाल. पण, हे खरं आहे.

समोरून ट्रेन येत होती. त्याठिकाणी फाटक नसल्यानं गाड्या थांबवण्यासाठी मोटरमन हॉर्न वाजवू लागला. मोठमोठ्यानं हॉर्न वाजवत असल्यानं गाड्या थांबतील असं सगळ्यांना वाटलं. पण, कुणीही गाड्या थांबवत नव्हतं. ट्रेन येतेय हे सगळेजण पाहत होते...तरीदेखील कुणीही गाड्या थांबवत नव्हतं. फाटक नसल्याचा फायदा हे ड्रायव्हर घेत होते. 5 मिनिट थांबवण्यापेक्षा ट्रेन येण्याआधीच आपणच जाऊ असा त्यांचा समज होता. अखेर मोटरमननंच गाडीचा वेग कमी करून रस्त्यावरून जाणा-या गाड्यांना जाऊ दिलं. हा सगळा प्रकार रस्त्यावर लावलेल्या सीसीटीव्हीत कैद होत होता. त्यामुळं ट्रेन येत असताना या रस्त्यावरून ज्या गाड्या चालल्या होत्या, त्या ड्रायव्हरवर कारवाई करण्यात आली. मात्र, ही ट्रेन वेगानं आली असती तर मोठा अपघात घडला असता. पण, मोटरमननं सावधगिरी बाळगत वेग कमी करून इतर गाड्यांना जायला दिलं. अमेरिकेतील जॉर्जियातील ऑगस्टा शहरात हा सगळा प्रकार घडला...पण, तुम्ही वाहतुकीचे नियम तोडू नका...अति घाई जीवावर बेतू शकते...

Web Title - Train and Car on one track


संबंधित बातम्या

Saam TV Live