VIDEO | 8 तास ड्युटी 5 तास प्रवास, मुंबईच्या नोकरदारांचे प्रचंड हाल

VIDEO | 8 तास ड्युटी 5 तास प्रवास, मुंबईच्या नोकरदारांचे प्रचंड हाल

कोरोनानं लॉकडाऊन लागला आणि सारा देश ठप्प झाला. आता हळहळू उद्योगधंदे सुरळीत होतायेत मात्र मुंबईची लाईफ-लाईन अद्याप पूर्ण क्षमतेनं रूळावर आलेली नाही. अशात नोकरदारांची अवस्था प्रचंड बिकट झालीय. आम्ही प्रवासातच मरायचं का ? ही चिंता नोकरदार वर्गाला भेडसावतीय. 

कधी बसमधून तर कधी खासगी वाहनातून पोटाची भूक भागवण्यासाठी नोकरादांचा हा असा दररोज खडतर प्रवास सुरूंय. कोरोनामुळे आधी लॉकडाऊन लागला आणि मुंबईची लाईफलाईन ठप्प झाली. आता उद्योगधंदे पूर्वपदावर येतायेत. मुंबईची लोकलही मर्यादित स्वरूपात सुरू झालीय. पण नोकरदारांना मात्र अशा हाल अपेष्टा सहन कराव्या लागतायेत. कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, नालासोपारा, वसई-विरार अशा दूर दूरच्या भागातल्या चाकरमान्याचा दिवस सुरू होतो तो बसच्या रांगेत उभं राहण्यापासून...आधीच बसेसची संख्या बोटावर मोजण्याइतकी अशातच तासन तास तिष्ठत राहिल्यानंतर त्याला बस किंवा इतर वाहनात प्रवेश मिळतो. पण पुढे सुरू होते त्याच्या संयमाची परीक्षा..कारण ट्रॅफिक जामचा सामना करत रडत रखडत ऑफिस गाठण्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो. त्यातही खड्डेमय रस्त्यांमुळे हा प्रवास आणखी लांबतोय. दररोजच्या या अग्निदिव्यामुळे शेकडो कर्मचाऱ्यांना लेटमार्कचा शेरा सहन करावा लागतोय. 

 बसेसची अपुरी संख्या, डेपोतली अस्वच्छता हा आता प्रवासी वर्गाच्या रोजच्या जगण्यातला भाग बनलीय. अधिकारी वर्गाकडून मात्र सर्व कारभार सुरळीत असल्याचं सांगण्यात येतंय. 

 सध्या मुंबईत काम करणाऱ्या लोकांची संख्या इतकी प्रचंड आहे की बसेसना त्याचा भार सोसता येणार नाही. रेल्वेनं लोकलसेवा सुरू केली असली तरी तिथं सरसकट सर्वांना प्रवेश नाही. हे असंच सुरू राहिलं तर आम्ही प्रवासातच मरायचं का असा ? संतप्त सवाल नोकरदारांकडून विचारला जातोय. सरकार आणि प्रशासनानं याचा गांभीर्यानं विचार करायला हवा. निदान लस येईपर्यंत तरी सर्वांना कोरोनासोबत जगायचंय. मग अशावेळी पोटासाठी धडपडणाऱ्या नोकरदारांचा, कामगारांचा विचार करायला हवा. लोकल किंवा वाहतुकीचे इतर पर्याय सुरू करायला हवेत. अन्यथा भविष्यातील मृत्यूचे आकडे हे कोरोनाचे नसतील तर जीवघेण्या प्रवासाचे असतील. 
 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com