ट्रिपल तलाक विरोधी विधेयक आज राज्यसभेत मांडले जाणार 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

मुस्लीम महिला विवाहविषयक हक्क संरक्षण म्हणजेच ट्रिपल तलाक विरोधी विधेयक गेल्या वर्षी लोकसभेत मंजूर करण्यात आले, मात्र ते राज्यसभेत प्रलंबित आहे. आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस असून हे सुधारित विधेयक आजच राज्यसभेत मांडले जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, तिहेरी तलाक बेकायदा ठरवणाऱ्या आणि तो देणाऱ्या पतीला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद असलेल्या विधेयकात केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी सुधारणा केली. या कायद्याचा दुरूपयोग होऊ नये, यासाठी ही सुधारणा झाली असून संबंधित पतीला परिस्थितीनुरूप जामीन देण्याचा अधिकार त्यानुसार न्यायालयाला देण्यात आला आहे. 

WebTitle :  marathi news triple talaq bill on table the of rajyasabha 

संबंधित बातम्या

Saam TV Live