देशातील मालवाहतूकदार आजपासून संपावर 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 19 जून 2018

देशातल्या मालवाहतूकदारांनी आजपासून संप पुकारलाय. इंधनातली दरवाढ, टोलदर या कारणांमुळे संपाची हाक देण्यात आलीय. या संपात देशातले जवळपास 90 लाख ट्रकचालक सहभागी होणार आहेत. या संपातून अत्यावश्यक वाहतूक सेवा वगळण्यात येणार आहेत.

महाराष्ट्रातले मालवाहतूकदार मंगळवारपासून या संपात सहभागी होणार आहेत. गेल्या तीन महिन्यांमध्ये डिझेलच्या किंमतीमध्ये 17 रुपयांनी वाढ झाली आहे.. थर्ड पार्टी विमा दरातल्या वाढीसह टोलचाही भार सोसावा लागत असल्यानं मालवाहतूकदार नाराज आहेत.

वाहतूकदारांच्या देशव्यापी संघटनेनं हा संप पुकारला आहे. जीवनावश्यक वस्तूंना यातून वगळण्यात आलं असलं तरी बंदरांच्या ठिकाणी या संपाचा फटका बसणार आहे. हा संप झाल्यास दिवसाला सुमारे 100 कोटींचे नुकसान होण्याचा दावा केला जातोय.  ​
 
संबंधित बातम्या

Saam TV Live