भारताकडील औषधासाठी ट्रम्प यांनी दिली धमकी, म्हणाले 'प्रत्यूत्तरास तयार राहा'

भारताकडील औषधासाठी ट्रम्प यांनी दिली धमकी, म्हणाले 'प्रत्यूत्तरास तयार राहा'

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताबद्दलचा मूड बदलला असून त्यांनी एका अर्थाने प्रत्युत्तरास तयार राहा, अशी थेट धमकी दिली आहे. ट्रम्प यांच्या चिडचि़डीमागचे कारण आहे ते मलेरियाच्याविरोधात वापरले जाणारा औषध हायड्रोक्सिक्लोकोक्विन!

हे औषध कोरोनाच्या उपचारात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचा अमेरिकेतील आरोग्य व्यवस्थेने दावा केला आहे. मात्र तेथील `एफडीए`ने कोरोनावरील औषध म्हणून त्यास मान्यता दिलेली नाही. तरीही  या औषधासाठी जगभराततून मागणी वाढली आहे. अमेरिकेत याची साठेबाजीचे प्रमाण वाढले आहे. तसेच त्याच्या किमतीतही वाढ झाली आहे. कोरोनाच्या उपचारात या औषधाची गरज पडणार असल्याने  भारताने चार एप्रिलपासून या औषधाच्या निर्यातीवर पूर्णपणे बंदी घातली आहे. या निर्णयाच्या आधी निर्यातीचे करार झाले असतील तर केवळ मानवतेच्या निकषांवर हे औषध इतर देशांना पाठविण्याच मान्यता देण्यात आली होती. हा अपवादही आता वगळण्यात आला आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी मोदी यांना विनंती केली होती. त्या विनंतीचे पुढे काय झाले, असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी तसे झाले नाही तर प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा दिला. 

भारताने विनंती मान्य केली नाही तर ठीक आहे. पण त्याला प्रत्युत्तर दिले जाईल. ते का द्यायचे नाही?, असे शब्द त्यांनी वापरले..  

ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार भारतात हे औषध अहमदाबाद येथील कॅडिला हेल्थकेअरची उपकंपनी असलेल्या झायडस फार्मास्युटिकल्सतर्फे उत्पादित केले जाते.  या कंपनीने 2019 मध्ये सोळा कोटी 70 लाख गोळ्या आतापर्यंत विकल्या. त्यातील दोन कोटी 80 लाख गोळ्या अमेरिकेला पुरविल्या आहेत. निर्यातीवर बंदी येण्याआधी या औषधाला वाढती मागणी लक्षात घेता या कंपनीने दहापटीने त्याचे उत्पादन वाढविण्याचे ठरवले होते.  

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com