ट्रम्प यांच्या वक्तव्यातून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वादाची ठिणगी

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 23 जुलै 2019

काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आपल्याकडे मदत मागितल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणि संसदेत एकच गोंधळ उडाला. पंतप्रधान मोदींनी स्पष्टीकरण द्यावं यासाठी विरोधक आक्रमक झाले. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयानं ट्रम्प यांचं विधान चुकीचं असल्याचं सांगत यावर लागलीच खुलासा केला. 

ट्रम्प यांच्या वक्तव्याची शिवसेनेनंही खिल्ली उडवलीय. त्यांच्या वक्तव्यकडे लक्ष देण्याची गरज नाही असं सेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हंटलंय. 

डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयानं अमेरिकेला खडे बोल सुनावलेत. मात्र विरोधक शांत व्हायला तयार नाहीत. त्यांच्या वक्तव्यानं देशातलं राजकीय वातावरण ढवळून निघालंय. 

ट्रम्प यांच्या वक्तव्यातून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वादाची ठिणगी पडलीय. आता हा वाद पुढचे काही दिवस असाच धुमसत राहणार एव्हढं मात्र नक्की.

WebTitle : marathi news trumps statement on kashmir chaos between government and opposition

संबंधित बातम्या

Saam TV Live