इंदुरीकर महाराजांनी लॉकडाऊनमध्ये बोलण्याचा रिायाज करावा - तृप्ती देसाई

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 29 मार्च 2020

इंदुरीकर महाराजांची वादग्रास्त वक्तव्य चांगलीच चर्चेत आहेत. त्यातल्या त्यात त्यांच्या विरोधातील लोक त्यांच्यावर वेगवेगळी विधानं करुन चर्चेत असतात. असंच तृप्ती देसाईंनी महाराजांना घरात बसून चांगलं बोलण्याचा रियाज करावा असा न मागता सल्ला दिलाय.

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे  देश लॉकडाऊन आहे. पुढील 21 दिवसांत किर्तनकार इंदुरीकर महाराजांनी चांगले बोलण्याचा रियाज करावा, असा सल्ला भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी दिला. त्यांच्या अनाहूत सल्ल्यामुळे इंदुरीकर महाराज समर्थक आणि देसाई यांच्यात शाब्दिक चकमक उडण्याची शक्यता आहे .

महाराज कीर्तनामुळे अतिशय व्यस्त असतात. त्यामुळे त्यांना चिंतन करण्याची हीच वेळ आहे. त्यांनी कीर्तनात हसवताना स्त्रियांविषयी अपशब्द बोलण्यापेक्षा चांगल्या शब्दाचा वापर करून समाज प्रबोधन करावे. स्त्रियांविषयी अनादराने बोलल्याबद्दल महाराजांनी या आधी दिलगिरी व्यक्त केली आहे. पण मी इथून पुढे माझ्या कीर्तनात असे शब्द वापरणार नाही, असे त्यांनी अद्याप जाहीरपणे सांगितलेले नाही. तसे त्यांनी सांगावे, अशी अपेक्षा देसाई यांनी व्यक्त केली.

VIDEO | मोदींनी साधला महाराष्ट्राच्या नर्सशी संवाद! पाहा काय म्हणाले मोदी
 

मी सुद्धा वारकरी सांप्रदायातील आहे. मी जर वर्षी नित्यनेमाने पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात असते. त्यामुळे महाराजांच्या संप्रदायाला विरोध नसून त्यांच्या स्त्रीविषयी वक्तव्याला आमचा विरोध आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. कीर्तन हे समाज प्रबोधनासाठी असते. समाज बिघडवण्यासाठी नाही. समोर हजारो लोक ऐकत असतात त्यात अनुकरण करणारेही असतात, असा सल्ला देसाई यांनी दिला.

``गोरी बायको करू नका. ती पळून जाईल, हे कुठल्या ग्रंथात लिहिलेले आहे का? चप्पल कितीही भारी असली तर आपण ती गळ्यात घालत नाही. बायको आहे तिला त्याप्रमाणेच वागवा. महिलेची चपलेशी तुलना करून महिलांचा अपमान केला जात आहे. तो आम्ही सहन करणार नाही. समाजप्रबोधन करणाऱ्या सर्व कीर्तनकार यांचा आम्ही सन्मानच करतो आणि त्यांना पाठिंबा आहेच. यापुढे महिलांचा किंवा समाजातील कोणत्याही घटकाचा अपमान न करता जर इंदुरीकर कीर्तन करणार असतील आणि त्यांनी मला आमंत्रण दिले तर नक्कीच त्यांचे चांगले शब्द वापरलेले कीर्तन ऐकायला मोठ्या मनाने मी जाईन, असे देसाई यांनी सांगितले.


संबंधित बातम्या

Saam TV Live