मुंढेंची राज्य एड्स नियंत्रण सोसायटीत नियुक्ती; पारदर्शक कारभारवाल्यांनाही मुंढे नकोसे?

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी सरकारमध्ये कुणालाच नकोत की काय अशी अवस्था आहे. किमान तुकाराम मुंढेंच्या बदल्यांबाबत तरी असंच म्हणावं लागेल. तुकाराम मुंढेंना साईड पोस्टिंगला टाकण्यात आलंय.

गेल्या महिना दीड महिनाभर विनापोस्टिंग असलेल्या तुकाराम मुंढेंना आता राज्य एड्स नियंत्रण सोसायटीच्या संचालकपदी नेमण्यात आलंय. ही पोस्टिंग साईड पोस्टिंग मानली जातेय.

नाशिकच्या महापालिका आयुक्तपदावरून हटवल्यानंतर तुकाराम मुंढेंना मंत्रालयात नियोजन विभागात नियुक्ती देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. पण मंत्रालयातले अधिकारी आणि राजकारण्यांना मुंढे तिथं नकोसे होते.

त्यामुळं नियोजन विभागात बदली झाली असतानाही त्यांनी तिथं पदभार स्वीकारला नव्हता. अखेर तुकाराम मुंढेंना राज्य एड्स नियंत्रण कक्षात नियुक्ती देण्यात आलीय. गंमतशीर गोष्ट म्हणजे पारदर्शक कारभाराचा दावा करणाऱ्या सरकारनं एका प्रामाणिक अधिकाऱ्याला साईड पोस्टिंगला टाकलंय.

WebTitle : marathi news tukaram mundhe deputed as president of AIDS control society  

संबंधित बातम्या

Saam TV Live