तुकाराम मुंढेंच्या जागी अश्‍विनी जोशी? 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 27 नोव्हेंबर 2018

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंच्या शिस्तीला वैतागलेल्या भाजप नेत्यांनी त्यांची बदली होताच फटाके वाजवून आनंद व्यक्त केला. मात्र, मुंढेंनी पदभार सोडल्यावर चार दिवस उलटले तरी नवे आयुक्त निश्‍चित होईनात. आता येथे अश्‍विनी जोशींचे नाव येत आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपचे नगरसेवकांना कंपवात झाला आहे. श्रीमती जोशी देखील तेव्हढ्याच कडक शिस्तीच्या असल्याने त्या आयुक्तपदी आल्यास आपली अवस्था आगीतुन फुफाट्यात पडल्यासारखी होईल, अशी उघड चर्चा सुरु आहे. 

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची शिस्त, नियमानुसार काम व प्रशासनावरील घट्ट पकड यामुळे सत्ताधारी भाजपचे नेते प्रचंड वैतागले होते. त्याविषयी सातत्याने तक्रार करीत होते. मुंढे यांची बदली करण्यात ते यशस्वी झाले. मुंढे क्षणाचाही विलंब न लावता नव्या नियुक्तीवर रुजू झाले. मात्र, चार दिवस उलटुनही नवे आयुक्त कोण याचे रहस्य कायम आहे. प्रारंभी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांचे नाव होते. त्यात तांत्रिक अडचणी आल्यावर आता अश्‍विनी जोशी यांचे नाव पुढे येत आहे. श्रीमती जोशी यादेखील तेव्हढ्याच कडक शिस्तीच्या असल्याचे बोलले जाते. 

अचानक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त अश्‍विनी जोशी यांचे नाव समोर आल्यानंतर भाजप नेत्यांना चांगलीच धडकी भरली आहे. जोशी यांचीही कारकीर्द गाजलेली असल्याने आगीतून निघून फुफाट्यात पडल्यासारखी अवस्था होईल की काय, अशी प्रतिक्रिया दिवसभर व्यक्त होत होती. मुंढे यांच्या कार्यपद्धतीमुळे लोकप्रतिनिधी विरुद्ध प्रशासन असा संघर्ष होत राहिला. मुंढे यांच्या विरोधात अविश्‍वास प्रस्ताव दाखल झाला होता. मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर तो मागे घेण्यात आला. मात्र, शेवटपर्यंत वाद शमला नाही. मुंढे यांच्या बदलीनंतर नगरसेवकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. आता मुंढे यांच्यानंतर कोण, अशी चर्चा पालिका वर्तुळात सुरू झाली आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त अश्‍विनी जोशी यांचे नाव चर्चेत आहे; परंतु मंत्रालय स्तरावरुन आदेश नसल्याने सध्या तरी ही चर्चाच आहे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live