कर्तव्यदक्ष तुकाराम मुंढे जनतेतून मंत्रालयात

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 22 नोव्हेंबर 2018

मुंबई : राज्याच्या प्रशासनाचा बहुचर्चित आणि वादग्रस्त चेहरा म्हणून ओळख असलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची अखेर जनतेसाठीच्या पदावरून थेट मंत्रालयात उचलबांगडी करण्यात आली आहे. 

मुंबई : राज्याच्या प्रशासनाचा बहुचर्चित आणि वादग्रस्त चेहरा म्हणून ओळख असलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची अखेर जनतेसाठीच्या पदावरून थेट मंत्रालयात उचलबांगडी करण्यात आली आहे. 

नाशिक महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या दबावाला राज्य सरकार बळी पडले. मुंढे यांच्या बदलीचा निर्णय घेतला. मुंढे उस्मानाबादला जिल्हाधिकारी म्हणून जाणार अशी चर्चा सुरू होती. मुंढेच्या बदलीमुळे नाशिककर जनता रस्त्यावर उतरली असताना उस्मानाबादमधील जनता मात्र ऐन दुष्काळाच्या काळात मुंढेसारखा कर्तव्यदक्ष अधिकारी येत असल्याने स्वागतास सज्ज झाली होती. पण, मुंढे यांना महापालिका अथवा जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यास सर्वच राजकीय पक्षातून टोकाचा विरोध दिसून येत होता. यावर तोडगा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंढे यांना थेट मंत्रालयात वित्त विभागाच्या सहसचिवपदी बसविले आहे,

यामुळे मुंढे यांना महापालिका अथवा जिल्हाधिकारी पदावर काम करत असताना थेट जनतेशी नाळ जोडून कर्तव्य तत्परता दाखविण्याची संधी आता मिळणार नाही. त्यांना राज्याच्या अर्थव्यवस्थेचा गाडा सक्षमपणे हाकावा लागणार आहे.  


संबंधित बातम्या

Saam TV Live