'साम'च्या दणक्यानंतर तूरडाळ घोटाळ्याप्रकरणी जिल्हा पुरवठा विभागाकडून पंचनामा; हादरलेले प्रशासन सुटीच्या दिवशीही लागले कामाला

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 12 ऑगस्ट 2018

'साम' टीव्हीने तूरडाळीचा काळाबाजार शनिवारी उघडकीस आणल्यानंतर रायगड जिल्हा पुरवठा विभागाने घटनास्थळी काही पाकिटे जप्त करुन पंचनामा केला. सामच्या दणक्यानंतर पणन आणि सार्वजनिक वितरण विभागांमध्ये टोलवाटोलवी सुरू झाली आहे.

हादरलेले प्रशासन सुटीच्या दिवशीही कामाला लागले आहे. डाळीच्या रिकाम्या पिशव्यांवरील बॅच क्रमांकाद्वारे ही डाळ मुंबईसाठी वितरित झाल्याचे स्पष्ट असून. रास्त धान्य दुकानदारांच्या माध्यमातून ही डाळ काळ्या बाजारात गेल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान तूरडाळ घोटाळ्यात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिधावाटप विभागाने जुलैमध्ये दोन लाख टन तूरडाळीची मागणी केली होती.

19 हजार टन तूरडाळीचे पैसेही पणन विभागाकडे जमा करण्यात आले होते. तरीही राज्याच्या शिधावाटप विभागाकडे तूरडाळ पोहोचलीच नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. मात्र, मुंबईच्या वेशीवर सापडलेल्या तूरडाळींच्या पाकिटांवर उत्पादन तारीख गेल्याच महिन्यातील असल्याने तूरडाळीची नेमकी वाट चुकली कुठे, असा प्रश्न विचारला जातोय.

संबंधित बातम्या

Saam TV Live