आंजर्लेत 15 पासून कासव महोत्सव

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 12 मार्च 2019

दाभोळ - पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या आंजर्ले समुद्रकिनाऱ्यावर यंदा 15 मार्चपासून कासव महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी आंजर्ले समुद्रकिनारी एकूण पाच कासवांची घरटी संरक्षित करण्यात कासव मित्रमंडळास यश आले असून सुमारे 700 अंडी संरक्षित करण्यात आली आहेत.

यावेळचा कासव महोत्सव आंजर्ले येथील कासव मित्रमंडळ संस्था,  चिपळूण येथील सह्याद्री निसर्ग मित्र व दापोली वन विभाग यांच्यावतीने आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव 15 ते 17 मार्च, 22 ते 24 मार्च व 11 ते 17 एप्रिल अशा तीन टप्प्यात होणार आहे. यावर्षी पहिल्या टप्प्यात होणाऱ्या महोत्सवादरम्यान येणाऱ्या शिमगोत्सवानिमित्त येणाऱ्या पर्यटकांसाठी होळीच्या फाका, खेळे, पालखी सोहळ्याचे खास आकर्षण असणार आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live