VIDEO | सिंधुदुर्गात टस्कर हत्तीचा धुमाकूळ, हत्तीमुळे कोकणातील शेतकरी मेटाकुटीला

साम टीव्ही
शनिवार, 13 जून 2020

 

  • सिंधुदुर्गात टस्कर हत्तीचा धुमाकूळ
  • दोडामार्ग तिलारी खोऱ्यात टस्कर हत्तीची दहशत
  • हत्तीमुळे कोकणातील शेतकरी मेटाकुटीला

सिंधुदुर्गात टस्कर हत्तींनी अक्षरश: धुमाकूळ घातलाय. हत्तींच्या दहशतीमुळे गावात राहायचं की नाही असा प्रश्न दोडामार्ग तिलारी खोऱ्यातल्या लोकांना पडलाय. आता हे हत्ती लोकांचा पाठलाग देखील करू लागलेत. 

हे केरळमधील दृश्य नाही. गुरूवारी संध्याकाळी दोडामार्ग तालुक्यातल्या मोर्ले  गावात हत्ती घुसल्यामुळे काही तरुण या हत्तीला पिटाळायला गेले. या तरुणांचा या टस्करनं पाठलाग केला . जिवाच्या आकांताने हे तरुण पळत मंदिरात आले  तिथेही हा हत्ती आला. त्या आधी या टस्कर हत्तीनं काजू रोपांची लागवड करण्यास गेलेल्या महिलांचा पाठलाग केला. या महिलाही जीव वाचवण्यासाठी पळत घरी आल्या. सध्या हा हत्ती मोर्ले गावाजवळ आहे. या टस्कर हत्तीमुळे दोडामार्ग तिलारी खोऱ्यातील लोकांचं जगणं मुश्किल झालंय. 

हा टस्कर हत्ती केर गावात रस्त्यावर फिरतांनाही दिसला. त्यामुळे गावात भीतीचं वातावरण पसरलंय.  केर, भेकुर्ली, मोर्ले, वीजघर, हेवाळे, बांबर्डे परिसरात अलिकडे हत्तींचा असा वावर सुरु आहे. हे हत्ती शेती आणि बागांचं मोठं नुकसान हे करत असल्यानं शेतकरी मेटाकुटीला आलाय. आता वनविभागानेच हत्तींचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागलीय. 

जंगलात खाण्यासाठी काहीच नसल्यानं हे हत्ती मानवी वस्तीकडे वळू लागले आहेत. भविष्यात एखादी जिवीतहानी होण्यापूर्वीच वनविभागानं या समस्येकडे लक्ष देणं आवश्यक आहे. 


संबंधित बातम्या

Saam TV Live